
सत्ता आपल्याच हातात आहे, असा विचार करणारी मंडळी गांधीजींचे स्वराज्य आणि देशाप्रतीचे निःस्वार्थ प्रेम कधीच समजू शकत नाहीत.
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी (ता.2) केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. महात्मा गांधी यांना बाजूला करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशाचे प्रतीक बनविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गांधी जयंतीनिमित्त राजघाट येथे त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
गांधीजींच्या वचनांची उजळणी करणे सोपे आहे; पण त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे मात्र महाकठीण. गांधीजींच्या नावाचा वापर करणारी मंडळी खुलेपणाने इतरांची दिशाभूल करत असून, आपणच किती शक्तिशाली आहोत, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या देशाची मूलभूत संरचना ही गांधी मूल्यांवर आधारित असल्याने त्यांना यामध्ये यश आलेले नाही.
गांधीजी जगभर अहिंसेसाठी ओळखले जात असत, हुकूमशाहीसाठी नाही, असा टोलाही सोनियांनी लगावला आहे. सत्ता आपल्याच हातात आहे, असा विचार करणारी मंडळी गांधीजींचे स्वराज्य आणि देशाप्रतीचे निःस्वार्थ प्रेम कधीच समजू शकत नाहीत. गांधीजी हे प्रेमासाठी ओळखले जातात द्वेषासाठी नाही, महात्मा गांधी हे लोकशाही मानणारे आहेत, हुकूमशाही नाही, असा टोलाही त्यांनी या वेळी बोलताना लगावला.
काँग्रेसने गांधीजींच्याच मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशात क्रांती आणण्याचा प्रयत्न केला. पंडित नेहरू, राजीव गांधी, नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग आदींची नावे घेता येतील. देशात विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले, असे सांगत त्यांनी बेरोजगारी आणि आर्थिक मंदीवरूनही सरकारवर टीका केली.
गाँधीजी और भारत को विपरीत दिखाने वाले चाहते हैं कि आरएसएस भारत का प्रतीक बने। उन्हें स्पष्ट बताना चाहती हूँ कि हमारी मिलीजुली संस्कृति, सभ्यता और समाज में गाँधीजी की सर्वसमावेशी व्यवस्था के अलावा कोई और सोच की जगह नहीं है: कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गाँधी#GandhiSandeshYatra pic.twitter.com/ZGVvMKQZnl
— Congress (@INCIndia) October 2, 2019
- Vidhan Sabha 2019 : पक्षनिष्ठ घरी अन् शिवसेनेची आयारामांना उमेदवारी
- ...म्हणून मुंडेंनी भगवानगड सोडून सावरगाव बनविले सत्तेचे केंद्र
- Vidhan Sabha 2019 : वडिलांसाठी मुलाने घेतली माघार; गणेश नाईकांना भाजपची उमेदवारी