Congress Rally | काँग्रेसचा 'नवसंकल्प' जोमात; राहुल गांधींची देशभर पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Sonia Gandhi and Rahul Gandhi
काँग्रेसचा 'नवसंकल्प' जोमात; राहुल गांधींची देशभर पदयात्रा

काँग्रेसचा 'नवसंकल्प' जोमात; राहुल गांधींची देशभर पदयात्रा

उदयपूरमध्ये नुकतंच नवसंकल्प शिबिर घेतलं. या नवसंकल्प शिबिरातून काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न करण्यासंदर्भात पावलं उचलण्यावर चर्चा झाली. यातूनच आता काँग्रेसने भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. (Rahul Gandhi India March)

हेही वाचा: ''काँग्रेस म्हणजे विचारसरणी गमावलेला भावाबहिणीचा पक्ष''

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हा यात्रा असेल. येत्या २ ऑक्टोबरपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. स्वातंत्र्यानंतरची काँग्रेसची (Congress) ही पहिलीच भारत यात्रा असेल. या यात्रेच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. एका दिवसात ही यात्रा किती अंतर पार करेल, एकूण किती दिवस लागतील अशा अनेक मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा होणार आहे.

हेही वाचा: चिंतन शिबिर : अल्पसंख्याकांना काँग्रेस पक्षात ५० टक्के कोटा!

३,५०० किलोमीटरच्या या यात्रेला ५ ते ६ महिन्यांत पूर्ण करण्याचं काँग्रेसचं नियोजन आहे. प्राथमिक नियोजन प्रतिदिन १० किलोमीटर पदयात्रा पार करण्याचं आहे. मात्र राहुल गांधींना (Rahul Gandhi) हे नियोजन मान्य नाही. त्यांना असं वाटतंय की प्रतिदिन ३५ किलोमीटर पदयात्रा करायला हवी.

हेही वाचा: पक्षातील नेते साथ सोडत असताना राहुल गांधी पुन्हा परदेश दौऱ्यावर

या यात्रेचा मार्ग तयार केला जात आहे. मात्र काँग्रेसचं नियोजन अधिकाधिक राज्यांमध्ये जाण्याचं आहे. या यात्रेची सुरुवात कन्याकुमारीपासून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या यात्रेदरम्यान काही सभा आणि अनेक कार्यक्रमही प्रस्तावित आहेत. काश्मीरपर्यंत ही यात्रा जाणार आहे, पण सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरला जाणार नाही.

Web Title: Congress Rally From Kashmir To Kanyakumari Rahul Gandhi Walk In Whole India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..