

सहमतीने सेक्स आणि बलात्काराचा गुन्हा..! अखेर सुप्रीम कोर्टाने फरक सांगत दिला मोठा निर्णय
esakal
Rape Case Supreme Court : बलात्काराशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सोमवारी (ता.२४) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, दोघांच्या सहमतीने असलेले प्रेमसंबंध तुटले, तर त्याच्या आधारे पुरुषाविरुद्ध दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा ग्राह्य धरला जाणार नाही. यावेळी झालेल्या सुनावणीत आरोपीविरुद्ध दाखल प्रकरणही रद्द करण्यात आले. जस्टिस बी. व्ही. नागरत्ना आणि जस्टिस आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ही याचिका ऐकून निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, विवाहाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे असणे गरजेचे आहे.