esakal | शेतकरी आंदोलनास बदनाम करण्याचे कारस्थान
sakal

बोलून बातमी शोधा

नवी दिल्ली: आंदोलक शेतकऱ्याने मंगळवारी लाल किल्ल्यावर शिखांचा पिवळा आणि केशरी झेंडा फडकवला.

प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार म्हणजे शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनास बदनाम करण्याचे कारस्थान आहे. या आंदोलनामुळे केंद्र पुरते हादरले आहे, असा आरोप किसान संघर्ष समन्वय समितीने केला.

शेतकरी आंदोलनास बदनाम करण्याचे कारस्थान

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचार म्हणजे शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनास बदनाम करण्याचे कारस्थान आहे. या आंदोलनामुळे केंद्र पुरते हादरले आहे, असा आरोप किसान संघर्ष समन्वय समितीने केला. कालच्या हिंसाचारातून आम्ही बरेच काही शिकलो आहोत, असे संघर्ष समितीचे जसबीरसिंग यांनी सांगितले. आज काही शेतकरी संघटनांनी प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावरही नाराजी व्यक्त केली.

भारतीय किसान युनियनचे भानुप्रताप सिंह यांनी आज दुपारी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘कालच्या हिंसाचाराने आपण व्यथित झालो असून नोएडा व गाझीपूर सीमांवरील आंदोलनांतून आपण माघार घेत आहोत. शेतकऱ्यांना बळी देण्यासाठी या आंदोलनाची सुरवात झालेली नव्हती. त्यामुळे आपण आंदोलन मागे घेत आहोत. या आंदोलनात आपण यापुढे सहभागी होऊ शकत नाही कारण याची दिशाच वेगळी असल्याचे आपल्याला काल जाणवले. आंदोलनाच्या नावाखाली आम्ही देशाला बदनाम करू इच्छित नाही.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतकरी मजूर संघटनेचे व्ही. एम. सिंग म्हणाले की, ‘टिकैत यांच्यासारख्यांबरोबर आम्ही या आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही. टिकैत यांनी शेतकऱ्यांना विशेषतः तरुणांना लाठ्या काठ्या घेऊन जाण्यास सांगून चिथावणी दिली. या आंदोलनास आम्ही शुभेच्छा देतो. टिकैत ज्या भागातून येतात तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांनी एकाही बैठकीत पुढे केल्या नाहीत. तिन्ही कायद्यांमुळे या शेतकऱ्यांचेही नुकसान होणार आहे.’

'जो बोलता है, वो बिकता है'; एलॉन मस्कनी असं काही म्हटलं की कंपनीचं नशीब फळफळलं

शेतकरी लाल किल्ल्याकडे जात असताना व फुटीरतावाद्यांनी तिथे वेगळा झेंडा फडकविण्याची चिथावणी दिल्याचे समजल्यानंतरही या झुंडीला रोखण्यासाठी काहीही केले  नाही. सरकार त्यावेळी काय करत होते?
- व्ही. एम सिंग, शेतकरी नेते

लाल किल्ल्यावर जे झालं त्याबद्दल माफ करा; शेतकऱ्यांचा मोठा निर्णय

काँग्रेसचा आरोप
प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या नावाखाली उपद्रवी घटकांनी केलेल्या हिंसाचारासाठी केंद्र,  गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा हल्ला काँग्रेसने चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहा यांना बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दीप संधूची ‘मोदी-शहा यांचा चेला’ अशी संभावना करताना हा संपूर्ण प्रकार शेतकरी आंदोलन कारस्थानाने दडपण्याचा प्रकार असल्याचाही आरोप केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, की ‘आक्रमक झुंड लाल किल्ल्यामध्ये शिरत असताना दिल्ली पोलिस मात्र हातावर हात ठेवून बसले होते.’

Edited By - Prashant Patil

loading image