AAP : ‘आप’मधील वाद चव्हाट्यावर

केजरीवाल तुरुंगात, खासदार परदेशात, चढ्ढा, मालिवाल तटस्थ
AAP
AAPesakal

नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पक्षातील (आप) मतभेद आता समोर येऊ लागले असून ‘आप’च्या राज्यसभेतील बहुतेक खासदारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

AAP
Nashik News : महामार्गावर कोसळला खांब! मनमाड शहरातील घटना

गेल्या २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर ‘आप’मध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी ‘लोकतंत्र बचाव महारॅली’ आयोजित करून केंद्र सरकारला ताकद दाखवून दिली. परंतु आता मात्र ‘आप’मधील मतभेद स्पष्टपणे दिसू लागले होते. लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असताना तसेच मुख्यमंत्री केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरुंगामध्ये झाल्यानंतर खासदार राघव चढ्ढा व खासदार स्वाती मालीवाल परदेशवारीवर गेले आहेत.

AAP
Dhule News : दोंडाईचात आरोग्य यंत्रणा कोलमडली; उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार दोनच डॉक्टरांवर

अरविंद केजरीवाल यांचे सर्वांत विश्वासू म्हणून खासदार चढ्ढांकडे पाहिले जात होते. परंतु डोळ्यावर उपचाराचे कारण देऊन ते लंडनमध्ये गेले. नेहमीच रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या खासदार स्वाती मालीवाल यासुद्धा अमेरिकेला गेल्या आहेत. नातेवाइकांची प्रकृती चांगली नसल्याने त्या अमेरिकेत गेल्याचे सांगितले.

AAP
Nashik Crime News : दोन घटनांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ! आडगाव, मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल

कविता यांची रेड्डींना धमकी

के. कविता यांच्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) खळबळजनक दावा केला. कविता यांनी ‘अरविंदो फार्मा’चे प्रवर्तक शरदचंद्र रेड्डी यांना २५ कोटी रुपये ‘आप’ला देण्यासाठी धमकावले होते, असे तपाससंस्थेने म्हटले आहे. या कंपनीलाच दिल्ली सरकारच्या उत्पादनशुल्क धोरणान्वये पाच विभाग देण्यात आले. रेड्डी यांना तुम्ही पैसे दिले नाही तर तेलंगण व दिल्लीमध्ये उद्योग करता येणार नाही अशी धमकी कविता यांनी दिली होती, असे सीबीआयने म्हटले आहे.

हरभजनसिंग क्रिकेटमध्ये व्यग्र

खासदार व क्रिकेटपटू हरभजनसिंग सुद्धा ‘आयपीएल’मध्ये समालोचन करण्यात व्यग्र आहेत. खासदार संजयसिंह व खासदार संदीप पाठक यांची उपस्थिती वगळल्यास राज्यसभेतील १० खासदारांपैकी बहुतेकांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. राज्यसभेतील बहुसंख्य खासदारांनी अटकेनंतर झालेल्या आंदोलनातून माघार घेतल्याचे दिसून येत आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार आनंद यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याचप्रमाणे विधानसभा सदस्यत्वाचासुद्धा राजीनामा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com