रुग्णालये सज्ज ठेवा, लसीकरण वाढवा; केंद्राचे राज्यांना निर्देश

लसीकरणाचा वेग वाढवावा आणि संसर्ग रोखण्यासाठी कठोर नियम लागू केले जावेत, असे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत.
corona
corona sakal

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Ministry) आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्यात, रुग्णालये सज्ज ठेवावीत, लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवावा आणि संसर्ग रोखण्यासाठी कठोर नियम लागू केले जावेत, असे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाना, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांना हे पत्र पाठविले आहे. सध्या नववर्षाचे स्वागत आणि लगनसराईमुळे लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने केंद्राकडून खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. अनेक भागांत हिवाळा आणि प्रदूषण वाढल्याने श्वसनाचे विकार देखील बळावले आहेत त्यांच्यावर देखील बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

corona
बार्शी नगरपरिषदेच्या प्रशासकपदी अमिता दगडे-पाटील यांची निवड

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येचा दिल्ली आणि मुंबईत सामूहिक संसर्ग म्हणजेच कम्युनिटी स्प्रेड सुरू झाल्याचे आढळून येत आहे. देशात ४९ दिवसानंतर १३ हजारांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. रूग्णसंख्येतील या वाढीमुळे केंद्राने राज्यांना पुन्हा सावधतेचा इशारा दिला आहे. दिल्लीत तर जे लोक देश सोडून गेले नाहीत किंवा बाहेरच्या देशातून आलेले नाहीत त्यांनाही ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळून येत असून दिल्लीत ११५ नव्या रुग्णांमध्ये ४६ टक्के रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळल्याचे आरोग्यमंत्री मंत्री सत्येंद्र जैन यांनी जाहीर केले. यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

दिल्लीत रुग्ण वाढले

दिल्लीतील रुग्णसंख्येत गेल्या २४ तासांत ८०% वाढ झाल्याने यंत्रणा हादरली आहे. विविध सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या २०० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात १०० जण दिल्लीचे आणि इतर लोक बाहेरच्या राज्यांमधील आहेत. ११५ रुग्णांमध्ये पॉझिटिव्ह चाचणी अहवाल येण्यापूर्वी कोणतीही कोरोना लक्षणे आढळली नव्हती, असे दिसून आले आहे.

corona
संसर्ग वाढल्यास निवडणुका लांबणीवर टाका; आयोगाला सरकारचा प्रस्ताव

सरसकट निर्बंधांना ममतांचा विरोध

सागर आयलंड (पश्चिम बंगालः कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरीसुद्धा सगळीकडे सरसकट निर्बंध लावता येणार नाहीत कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो, असे स्पष्ट मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडले आहे. पुढील महिन्यात सागर आयलंड येथील दक्षिण-२४ परगणा जिल्ह्यात गंगा सागर मेळा सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी आज या भागाला भेट देत आढावा घेतला.

कोलकत्यामध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सावध झाले आहे.ममता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की,‘‘ ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉन बाधित अधिक असल्याचे दिसून आले आहे. परदेशांतून आलेल्यांमुळे तो विषाणू येथे पसरला हे वास्तव आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जिथे ओमिक्रॉन संसर्ग अधिक आहेत तिथून येणारी विमाने पूर्णपणे थांबवावीत. राज्यातील अर्थव्यवस्थेचा विचार करूनच नव्या निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. शेवटी लोकांची सुरक्षा देखील महत्त्वाची असल्याने निर्बंध लागू करण्यात येतील. मागील दोन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला असल्याने आम्हाला सरसकट निर्बंध लागू करता येणार नाहीत.’’

केंद्र महाराष्ट्राच्या संपर्कात

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. केंद्राचे पथक मुंबईत पोहोचले आहे. देशात कोरोना रुग्णसंख्याही वेगाने वाढू लागली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसह आपत्कालीन बैठक घेतली. जूननंतर राजधानीत सर्वाधिक रुग्णसंख्या झाल्याने दिल्ली सरकारने “यलो अलर्ट” जारी करत निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com