
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आता लॉकडाऊनमधील आणखी काही निर्बंध शिथिल केले आहेत. याबाबतचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आता लॉकडाऊनमधील आणखी काही निर्बंध शिथिल केले आहेत. याबाबतचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये सिनेमागृहे जास्त क्षमतेनं सुरू करता येणार आहेत. तसंच स्विमिंग पूलसुद्धा उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
गाइडलाइन्स 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या असून त्या 1 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील.
Union Home Ministry issues an order to enforce guidelines for surveillance, containment & caution which will be effective from Feb 1 to Feb 28; states/UTs mandated to continue to enforce containment measures & SOPs on various activities & COVID appropriate behaviour. pic.twitter.com/owHbYZVgmt
— ANI (@ANI) January 27, 2021
कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळून सार्वजनिक कार्यक्रमांना परवागनी असणार आहे. तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र यासाठी बंदी असेल. परवानगी शिवाय अशा कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही.
हे वाचा - शेतकरी आंदोलनात फूट; टिकैत यांनी विश्वासघात केला म्हणत एका गटाची माघार
भारतातील कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या 24 तासात देसात 12 हजार 689 नवे रुग्ण आढळले असून 137 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी 13 हजार 320 नवी रुग्ण आढळले होते. सध्या देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 6 लाख 90 हजार इतकी झाली असून आतापर्यंत एक लाख 53 हजार 724 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्यासुद्धा कमी होऊन ती 1 लाख 76 हजार इतकी झाली आहे.