Corona - महाराष्ट्र-केरळने वाढवली चिंता; देशाच्या रुग्णसंख्येपैकी 71 टक्के रुग्ण दोन राज्यात

Corona
Corona

नवी दिल्ली - महाराष्ट्रासह देशभरातील सहा राज्यांत कोरोनाची दुसरी लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्याच्या एक लाख ९७ हजार २३७ सक्रिय रूग्णांमध्ये ७१.६९ टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्र व केरळ याच दोन राज्यांत आहेत. याशिवाय गुजरात, पंजाब, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांतूनही रूग्णवाढीचे आकडे समोर आले आहेत. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत देशात २३ हजार २८५ नवे रूग्ण आढळले. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १ कोटी १३ लाख झाला आहे. बरे होणारांचे प्रमाण ९६.८५ टक्के आहे. कोरोनामुळे १ लाख ५८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी प्राण गमावले. देशातील विविध प्रयोगशाळांध्ये मागील २४ तासांत ७ लाख ४० हजारांहून जास्त कोरना चाचण्या करण्यात आल्या. एकूण २२ कोटी लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात पहिल्या टप्प्याचे लसीकरण झालेल्यांची संख्या २ कोटी ६१ लाख ६४ वर पोहोचली आहे. याशिवाय भारताने आतापावेतो जगातील ७० देशांना भारतीय लसीचा पुरवठा केला आहे. ३५ देशांना एकूण ८० लाख डोस संपूर्ण निशुल्क देण्यात आले तर १८ देशांना कोव्हॅक्‍स सुविधेअंतर्गत १ कोटी ६८ लाख लसींचे डोस पाठपिण्यात आल्याचे केंद्राने सांगितले.

त्रिसूत्रीचे कठोरपणे पालन 
महाराष्ट्रासह सहा राज्यांतून वाढती रूग्णसंख्या पहाता केंद्रीय आरोग्य यंत्रणेने विशेष पावले उचलली आहेत. महाराष्ट्र- केरळात गेलेल्या केंद्रीय पथकांच्या दैनंदिन अहवालांवर राज्याच्या आरोग्य यंत्रणेशी दिल्लीहून रोजच्या रोज संपर्क साधला जात आहे. ट्रॅक-ट्रेस-ट्रीट ही त्रिसूत्री कठोरपणे अंमलात आणण्याच्या सूचना राज्य सरकारला वारंवार देण्यात आल्या आहेत.

राज्यात १५ हजार नवे रुग्ण
पुणे - राज्यात गेल्या चोवीस तासांत १५,८१७ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ५६ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२,८२,१९१  झाली आहे. पुणे महानगरपालिकेत आज १८४५ तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ८४१ रुग्णांची वाढ झाली. नागपूर (१७२९), मुंबई मनपा (१६४७), नाशिक शहर (७१५), जळगाव (६८८), औरंगाबाद पालिका (६०९) आणि यवतमाळ (४५५) येथेही रुग्णवाढ झाली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com