esakal | कोरोनावरचं प्रभावी औषध देशातील या 5 राज्यांमध्ये पोहोचलं, आठवड्याभरात 1 लाख इंजेक्शनचे टार्गेट 

बोलून बातमी शोधा

covifor

कोरोनावर प्रभावी ठरत असलेलं औषध रेमडेसिवीरचे 20 हजार बाटल्या तयार झाल्या आहेत. ही औषधे आता 5 राज्यांमध्ये पाठवण्यात आली आहेत.

कोरोनावरचं प्रभावी औषध देशातील या 5 राज्यांमध्ये पोहोचलं, आठवड्याभरात 1 लाख इंजेक्शनचे टार्गेट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. भारतात गेल्या काही दिवसांपासून दररोज दहा हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यातच कोरोनावर प्रभावी ठरत असलेलं औषध रेमडेसिवीरचे 20 हजार बाटल्या तयार झाल्या आहेत. ही औषधे आता 5 राज्यांमध्ये पाठवण्यात आली आहेत. अमेरिकन कंपनी गिलीड सायन्सेसनं हे औषध तयार केलं आहे. तर भारतात याला तयार कऱण्याचं लायसन हेटेलो लॅबला मिळालं आहे.

चीनच्या कुरापती सुरूच; आता या भागात वाढविले येथे सैन्य

हेटेरो हेल्थकेअरने बुधवारी या औषधाबाबतची माहिती दिली असून कंपनीच्या 20 हजारच्या सेटमध्ये 10 हजार बाटल्या या हैदराबाद, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात पाठवण्यात येतील. तर 10 हजार बाटल्या कोलकाता, इंदौर, भोपाळ, लखनऊ, पटना, भुवनेश्वर, रांची विजयवाडा, कोचिन, त्रिवेंद्रम आणि गोव्यात पुढच्या आठवड्याभरात पाठवल्या जातील. कंपनीने सांगितले की, या औषधाची कमाल किंमत 5 हजार 400 रुपये प्रती बाटली ठरवण्यात आली आहे. 

Fair & Lovely मधून Fair जाणार!

कोविफोर रेमडेसिवीरचं पहिलं जेनेरिक औषध आहे. कंपनीने म्हटलं की या औषधाचा वापर लहान मुलं आणि रुग्णालयातील कोरोनाची लागण झालेल्यांवरही करता येईल. हे औषध 100 एमजीच्या औषधाच्या बाटलीमध्ये असेल. इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णाला ते देण्यात येणार असल्याचंही कंपनीने सांगितलं. 

WHO ने कोरोनाबाबत दिला आणखी एक इशारा; सांगितले...

अमेरिका, बारत आणि दक्षणि कोरियामध्ये गंभीर रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीरच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. तर जपामनमध्ये याच्या पुर्ण वापराला परवानगी आहे. मात्र सिप्लाने अजुनही स्पष्ट केलं नाही की, CIPREMI केव्हापासून बाजारात उपलब्ध होईल. अमेरिकेत अजुनही रेमडेसिवीरची किंमत ठरलेली नाही. गिलीडने सोमवारी सांगितलं होतं की, वर्षाअखेरपर्यंत 2 कोटी रेमडेसिवीर उपलब्ध करू दिले जातील. रेमडेसिवीरची ट्रायल अमेरिका, युरोप आणि आशियातील 60 सेंटर्समध्ये 1063 रुग्णांवर कऱण्यात आली होती. यामध्ये रुग्ण बरे होण्यात औषध प्रभावी ठरले होते. हे औषध दिलेल्या रुग्णांमध्ये मृत्यू दराचे प्रमाण 7.1 टक्के इतकं होतं.