Corona : परदेशी प्रवाशांसाठी नवे SOP; राज्यात रुग्णवाढीमुळे वाढली चिंता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात अजिबात ढिलाई न बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात अजिबात ढिलाई न बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातील प्रवाशांसाठी नवे SOP लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 22 फेब्रुवारीपासून हे नवे नियम लागू केले जाणार आहेत. राज्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे. 

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,881 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,09,50,201 वर पोहोचली आहे. काल 11,987 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,06,56,845 वर जाऊन पोहोचली आहे.

हेही वाचा - वाढत्या कोरोनामुळे परदेशी प्रवाशांसाठी नवे SOP; 22 फेब्रुवारीपासून नियमांची अंमलबजावणी

गेल्या 24 तासांत 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूम मृतांची संख्या ही 1,56,014 वर पोहोचली आहे. सध्या देशात 1,37,342 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. देशात लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 94,22,228 जणांना लस दिली गेली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे नवे 4,787 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 20,76,093 वर पोहोचली आहे. काल राज्यात 3,853 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,85,261 वर पोहोचली आहे. काल राज्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 51,631 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 38,013 ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update india marathi update 18 February