Corona Update: कोरोनाच्या जेएन.1 व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या एक हजाराच्या वर

जेएन.१ व्हेरियंटचा रुग्ण उत्तर प्रदेशातही आढळला असून यानंतर सदर व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेल्या राज्यांची संख्या १६ वर पोहोचली आहे.
JN.1 Covid
JN.1 Covid

नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या एक हजाराच्या वर गेल्याची माहिती सार्स सीओव्ही २ जिनोमिक्स कन्सोर्टियमकडून (आयएनएसएसीओजी) शुकवारी देण्यात आली. जेएन.१ व्हेरियंटचा रुग्ण उत्तर प्रदेशातही आढळला असून यानंतर सदर व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेल्या राज्यांची संख्या १६ वर पोहोचली आहे.

कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट म्हणून जेएन.१ व्हेरिएंट ओळखला जातो. कर्नाटक राज्यात या व्हेरिएंटचे सर्वाधिक २१४ रुग्ण आहेत. यापाठोपाठ महाराष्ट्रात १७०, केरळमध्ये १५४, आंध्र प्रदेशात १८९, गुजरातमध्ये ७६, गोवा राज्यात ६६, राजस्थान आणि तेलंगणमध्ये प्रत्येकी ३२, छत्तीसगडमध्ये २५, तामिळनाडूमध्ये २२ रुग्ण सापडले आहेत.

याशिवाय दिल्लीत १६, उत्तर प्रदेशात ६, हरियाणामध्ये ५, ओडिशामध्ये ३, पश्चिम बंगालमध्ये दोन तर उत्तराखंडमध्ये एक रुग्ण सापडलेला आहे.

JN.1 Covid
Rohit Sharma : वर्ल्डकपला सामोरे जाताना... रोहितचं ते एक वक्य अन् हार्दिक पांड्याचा जीव झाला वरखाली

ताज्या आकडेवारीनुसार देशातील जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १०१३ वर पोहोचली आहे. अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट धोकादायक असल्याने आवश्यक ती दक्षता बाळगावी, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना यापूर्वीच दिलेले आहेत. (Latest Marathi News)

JN.1 Covid
Atal Setu: मुंबईतील 'अटल सेतू'च्या उद्घाटनावेळी PM मोदींनी काढली शिंजो अबेंची आठवण; म्हणाले, आम्ही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com