esakal | Corona Update : भारतात 1,73,413 ऍक्टीव्ह रुग्ण; राज्यात नवे 9,855 रुग्ण

बोलून बातमी शोधा

Corona.}

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Corona Update : भारतात 1,73,413 ऍक्टीव्ह रुग्ण; राज्यात नवे 9,855 रुग्ण
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 17,407 नवे रुग्ण आढळले आहेत. काल 14,031 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे तर 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  • आजवरचे एकूण रुग्ण: 1,11,56,923
  • आजवर बरे झालेले रुग्ण: 1,08,26,075  
  • एकूण मृत्यू: 1,57,435
  • ऍक्टीव्ह रुग्ण: 1,73,413 
  • एकूण लसीकरण: 1,66,16,048

हेही वाचा - SpaceX च्या रॉकेटचं उड्डाणानंतर यशस्वी लँडिंग; मात्र काही क्षणातच स्फोट
काल 7,75,631 चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण आजवरच्या चाचण्यांची संख्या ही 21,91,78,908 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

महाराष्ट्र राज्यात काल 9,855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच नवीन 6559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% झाले आहे.