esakal | पुन्हा आढळले अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांच्या संख्येतही वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

पुन्हा आढळले अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांच्या संख्येतही वाढ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Updates: नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट देशात हाहाकार माजवत असल्याचे सोमवारी (ता.१९) पुन्हा एकदा दिसून आले. सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत देशात २ लाख ५९ हजार १७० नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर १७६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एकाच दिवसात मृत्यू झालेल्यांची ही विक्रमी नोंद ठरली आहे. यासह मृतांची एकूण संख्या १ लाख ८० हजार ५३० वर पोचली आहे.

हेही वाचा: दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर दुपटीने वाढणार

सोमवारी दिवसभरात १ लाख ५४ हजार ७६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारच्या आकडेवारीनंतर देशभरातील सक्रिय रुग्णसंख्या २० लाख ३१ हजार ९७७ वर पोचली आहे. गेल्या सहा दिवसांपासून दररोज दोन लाखाच्या पुढे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ८९ झाली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३१ लाख ८ हजार ५८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १२ कोटी ७१ लाख २९ हजार ११३ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तसेच २६ कोटी ९४ लाख १४ हजार ३५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभरात १५ लाख १९ हजार ४८६ जणांची चाचणी करण्यात आली.

हेही वाचा: आजपासून दुपारी १ वाजेनंतर दुकाने, बाजारपेठा बंद; फक्त मेडिकल्स राहतील सुरू

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ५८ हजार ९२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत, तर ५२ हजार ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ लाख ९८ हजार २६२ झाली आहे. आतापर्यंत राज्यात ६० हजार ८२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यात ६८ हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण आढळले होते.

दुसरीकडे केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ४५ वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत होती. १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा: 18 वर्षांवरील सर्वांना लस; नोंदणी कशी कराल?

loading image