Corona Updates: देशातील रुग्णवाढीचे प्रमाण स्थिर, दिवाळीनंतर प्रभाव वाढण्याची शक्यता

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 13 November 2020

मागील काही दिवसांत कोरोनाच्या चाचण्या वाढताना दिसल्या आहेत.

नवी दिल्ली: मागील 24 तासांत कोरोनाचे 44 हजार 878 नवीन रुग्ण आढळले असून 547 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 87 लाख 28 हजार 795 जणांना कोरोनाची (COVID19) बाधा झाली असून 1 लाख 28 हजार 688 जणांचा मृत्यू झाला आहे. 

24 तासांत 49 हजार 79 रुग्णांना डिस्चार्ज-
दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत कोरोनातून बरे होणाऱ्याचे प्रमाण चांगले राहिले आहे. सध्याचा कोरोनाचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात कोरोनाचे 81 लाख 15 हजार 580 कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील 24 तासांत कोरोनाच्या 49 हजार 79 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

 

राहुल गांधींमध्ये कमी योग्यता, बराक ओबामांनी पुस्तकात केला उल्लेख

 रुग्णवाढीचे प्रमाण घटले-
तसेच मागील 24 तासांत देशातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण 4 हजार 747 ने कमी झाले (cured cases) आहेत. सध्या देशात कोरोनाचे 4 लाख 84 हजार 547 रुग्ण कोरोनावर उपचार (active cases) घेत आहेत. यापुर्वी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली होती. पण आता कोरोनाच्या रुग्णवाढीचे प्रमाण घटले आहे, तसेच सक्रिय रुग्णही कमी होत आहेत.

 

 दिल्ली आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर

चाचण्यांचे प्रमाण वाढले-
मागील काही दिवसांत कोरोनाच्या चाचण्या वाढताना दिसल्या आहेत. गुरुवारी एका दिवसात कोरोनाच्या 11 लाख 39 हजार 230 चाचण्या पार पडल्या. तर आतापर्यंत देशात 12 कोटी 31 लाख 1 हजार 739 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे. दिवाळीनंतर कोरोचा प्रभाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates cases rate steady after diwali may cases increases