Corona Vaccine - लशीबद्दल पसरतायत अफवा, होतेय फसवणूक; जाणून घ्या खरं-खोटं

covishield
covishield

नवी दिल्ली - भारतात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेची रंगीत तालिम शनिवारी होणार आहे. यादरम्यान, व्हॅक्सिनबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांना याबाबत सावध केलं आहे. त्यांनी सांगितलं की, काहीच विचार न करता, समजून न घेता माणसांचे कितीतरी नुकसान होईल. कित्येक अफवा पसरवल्या जात आहेत आणि अजुनही परसवल्या जातील. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन मोदींनी केलं. व्हॅक्सिनबाबत कोणत्या अफवा पसरवल्या जात आहेत याची माहिती आपण घेऊ.

कोरोना व्हॅक्सिनमध्ये डुकराची चरबी?
फायजर, मॉडर्ना, एस्ट्राझेनकाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे की, व्हॅक्सिनमध्ये डुकराचे मांस वापरेलं नाही. व्हॅक्सिनन साठवण्यासाठी, तसंच सुरक्षित आणि प्रभावी रहावी यासाठी डुकराच्या मांसाचा वापर करून तयार केलेल्या जिलेटीन वापरले जाते. मात्र काही कंपन्या डुकराचे मासं न वापरता लस तयार करण्यावर कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. स्वित्झर्लंडमधील औषध कंपनी नोवारिटसने डुकराचे मांस वापरून मॅनिंजाइटिस लस तयार केली होती. तर सौदी, मलेशियातील कंपनीही अशा प्रकारची लस टयार कत आहेत. 

लस घेण्याबाबत मुस्लिम संघटना आणि तज्ज्ञ काय सांगतात?
युएईतील फतवा काउन्सिलचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या, इस्राईलमधील रब्बानी संघटनेचे जोहरचे अध्यक्ष रब्बी डेविड स्टेव यांच्यासह जगभरातील तज्ज्ञांनी कोरोनाच्या लसीमध्ये डुकराचे मांस वापरले तरी ते मुस्लिमांसाठी योग्य असल्याचं म्हटलं आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इतर काही पर्यार नसेल तर कोरोना लस बंदीतून वगळली पाहिजे कारण माणसांचा जीव वाचवणं याला प्राधान्य द्यायला हवं. या सर्वांचे म्हणणे आहे की, जर हे तोंडावाटे न घेता, इंजेक्शनमधून असेल तर काही अडचण नाही. आजारी असताना याचा वापर अपवादात्मक परिस्थितीत योग्य आहे. 

रजिस्ट्रेशनबाबत अफवा, फसवणुकीचा प्रकार
कोरोना व्हायरसमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आता व्हॅक्सिन तयार झाले असताना त्याच्या नावाने फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी फोन करून पैसे मागितले जात आहे. आरोग्य विभागाने अशा कॉलपासून सावध राहण्याचे आणि कोणतीही माहिती शेअर न कऱण्याचे आवाहन केले आहे. रजिस्ट्रेशनसाठी कोणत्याही प्रकारचे कॉल केले जात नाहीत. आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हॅक्सिन देण्याचे काम जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरु होईल. सध्या यासाठी रजिस्ट्रेशन सुरू नाही त्यामुळे असे काही कॉल आले तर पोलिसांना कळवा असंही सांगण्यात आलं आहे. 

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर व्हॅक्सिन प्रभावी नाही?
कोरोनाचे रुग्ण कमी झाले असताना आता नव्या स्ट्रेनचा धोका निर्माण झाला आहे. फायजर आणि मॉडर्नाच्या व्हॅक्सिनला अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या व्हॅक्सिनला कोरोनाचे प्रोटीन ओळखून शरिरात त्याच्याविरोधात अँटिबॉडी तयार करण्याच्या दृष्टीने विकसित केलं आहे. यामुळे शऱिरातील सेल्सला काही नुकसान नाही. मात्र जर नव्या स्ट्रेनमध्ये प्रोटिनमध्ये बदल करण्याची क्षमता असेल तर व्हॅक्सिन प्रभावी ठरेल का? तज्ज्ञांनी म्हटलं की व्हॅक्सिन तेव्हाही प्रभावी ठरेल कारण हा प्रोटीनमधील बदल दुर्मीळ असा आहे. व्हॅक्सिनसुद्धा बदलाप्रमाणे स्वत: अपडेट होत असते. म्हणजे व्हारयसमध्ये होणाऱ्या बदलानंतरही प्रभावी राहिल. फायजर आणि मॉडर्ना व्हॅक्सिनबाबत चांगली गोष्ट ही आहे की, सार्स Cov-2 सारख्या व्हायरसमध्ये आपोआप बदल करू शकते. ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ इंग्लंडनेसुद्धा गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, फायजरची व्हॅक्सिन नव्या स्ट्रेनविरोधात प्रभावी नाही याचा कोणताच पुरावा उपलब्ध नाही. 

अॅलर्जी असलेल्यांना लस दिली जाऊ शकत नाही?
कोरोना व्हॅक्सिनमधील काही घटकांची ज्यांना अॅलर्जी असेल त्यांना लस दिली जाऊ शकत नाही हे खरं आहे. मात्र अशा लोकांची संख्या खुपच कमी आहे. कोरोना व्हॅक्सिनमधील एकच घटक असा आहे ज्याची अॅलर्जी असू शकते. यात पॉलिथायलिन ग्लायकोल सारख्या घटकाची अॅलर्जी असू शकतो. कोणतेही व्हॅक्सिन तेव्हाच अॅलर्जी असलेल्या व्यक्तीला देणं टाळलं जातं जेव्हा त्यात व्यक्तीला अॅलर्जी असलेले घटक असतात. याआधी अंड्यांपासून फ्लू व्हॅक्सिन तयार केले जात होते. त्यामुळे ज्यांना अंड्यांची अॅलर्जी होती त्यांना फ्लू व्हॅक्सिन दिलं जात नाही. आता फ्लू व्हॅक्सिन अंड्यांपासून तयार होत नाही. तसंच कोरोना व्हायरसच्या लशीमध्येही याचे काही घटक नाहीत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com