esakal | आला हिवाळा, आरोग्य सांभाळा; थंडीत कोरोना बदलू शकतो रुप
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Winter

गेल्या काही महिन्यात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आल्याने व्हायरस अधिक पसरण्याची शक्यता ही कायम आहे.

आला हिवाळा, आरोग्य सांभाळा; थंडीत कोरोना बदलू शकतो रुप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मार्च महिन्यात भारतात मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरवात झाली. यावेळी येऊ घातलेल्या उन्हाळ्यातील उष्णतेचा व्हायरसवर परिणाम होईल आणि तो निष्क्रिय होईल, असे काहीसे तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, त्यानंतरच्या काळातही कोरोनाचा हाहाकार तसाच सुरु राहीला. सध्या उत्तर आणि दक्षिण गोलाधार्थ हवामानामध्ये बदल घडताना दिसून येतोय. थंडी हळूहळू वाढू लागली आहे. प्रश्न हा आहे की थंडीच्या दिवसात कोरोना व्हायरसचे स्वरूप काय असेल? खरंतर जागतिक आरोग्य संघटनेने हे आधीच स्पष्ट केलं आहे की, हवामानातील बदल हे व्हायरच्या स्वरुपावर आणि त्याच्या कामगिरीवर काहीह प्रभाव टाकू शकणार नाही. मात्र, अभ्यासक कोरोना व्हायरस तापमानातील घटामुळे होणाऱ्या परिणामावर अभ्यास करत आहेत. 

विशेषतज्ञांनी सांगितलं की व्हायरस उन्हाळ्याच्या दिवसात अधिक सक्रिय राहिला आहे. त्यांनी यासंदर्भात उदाहरण देताना सांगितलं की जगातील अनेक भागात हिवाळ्यात इन्फ्लूएंझा होणे हे सर्वसामान्य आहे. मात्र, भारतात हिवाळा ऋतू हा फारच अल्पकाळ असतो. मात्र, थंडीचा कोरोनावर काही परिणाम होईल, असा कोणताही निश्चित निष्कर्ष अद्याप समोर आला नाहीये. 

हेही वाचा  - राजकारणातील 'हवामान तज्ज्ञ'; बिहारच्या निवडणुकीचे वातावरण तर सांगून गेले नाहीत ना?
हिवाळ्यात कोरोना व्हायरसचे स्वरुप
पाश्चिमात्य देशांमध्ये कडक थंडी असते. लोक घरातून बाहेर पडतानाही विचार करुनच बाहेर पडतात. त्यामुळे, असा तर्क मांडला जात आहे की, या देशांमध्ये कडक हिवाळ्यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी होऊन व्हायरसचा प्रादुर्भाव देखील कमी होईल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे माजी उपसंचालक आणि व्हायरस संशोधक डॉ. एम. एस. चड्ढा यांच्या म्हणण्यानुसार, हा तर्क भारताच्या हवामानाचा अंदाज घेता आपल्या देशासाठी चपखलपणे लागू होणारा नाहीये. कारण, भारतात हिवाळा कडक नसल्याने लोक घरातच राहतील याची काही खात्री नाही. यामुळे व्हेंटीलेटर्स अधिक असणे गरजेचे आहे. उत्तर भारतात तर लोक थंडीपासून वाचण्यासाठी उन्हात बसायला बाहेर पडतात. 

हेही वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणः फादर स्टॅन स्वामींना अटक, NIA ची कारवाई

अन्य देशात कोरोनाची अवस्था
इन्फ्लूएन्झा हा हिवाळ्यात पसरणारा एक व्हायरल आजार असल्याकारणाने आणि दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये मे ते जुलैमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र असं काही पहायला मिळालं नाहीये. इन्फ्लूएन्झाच्या केसेसमध्ये घट झाल्याचेच दिसून आले आहे ज्याचे कारण कोरोना व्हायरस असल्याचं म्हटलं जातंय. कोरोना व्हायरसमुळे लोक काळजी म्हणून सोशल डिस्टंन्सिगचे पालन करु लागल्यामुळे फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाला. 

हेही वाचा - Bihar Election - शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही उतरणार बिहारच्या रणांगणात; पण युती नाहीच
अद्याप भारतीयांच्या चिंतेत वाढ का?
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला लक्षात घेऊन संशोधक आणि डॉक्टर वेगवेगळे तर्क देत आहेत. डॉ. शंशाक जोशीच्या म्हणण्यानुसार भारतात हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. खासकरुन उत्तर भारतात याचा प्रादुर्भाव अधिक असू शकतो. तर संशोधक डॉ. गगनदीप कंग यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आल्याने व्हायरस अधिक पसरण्याची शक्यता ही कायम आहे. म्हणून कोरोनासंदर्भातील सर्व नियम नागरिकांना पाळणे अत्यावश्यक असल्याचे बोललं जात आहे. 

loading image