esakal | सावधान बाहेर पडूच नका; हेल्थकेअर वर्कफोर्सला तयार राहण्याचे निर्देश

बोलून बातमी शोधा

सावधान बाहेर पडूच नका; हेल्थकेअर वर्कफोर्सला तयार राहण्याचे निर्देश

कोरोनाचा देशभरातील संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारची कृती ही पूर्वनियोजित, सक्रीय आणि परिणामकारक स्वरूपाची असल्याचे सांगताना केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय जाहीर करण्यात आल्याची बाब फेटाळून लावली. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने याआधीच सर्वसमावेशक अशी कृती यंत्रणा सज्ज ठेवली होती. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा देण्याच्या खूप आधीच या उपाययोजना आखण्यात आल्या होत्या असेही सरकारकडून सांगण्यात आले.

सावधान बाहेर पडूच नका; हेल्थकेअर वर्कफोर्सला तयार राहण्याचे निर्देश
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाचा देशभरातील संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारची कृती ही पूर्वनियोजित, सक्रीय आणि परिणामकारक स्वरूपाची असल्याचे सांगताना केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय जाहीर करण्यात आल्याची बाब फेटाळून लावली. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने याआधीच सर्वसमावेशक अशी कृती यंत्रणा सज्ज ठेवली होती. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा देण्याच्या खूप आधीच या उपाययोजना आखण्यात आल्या होत्या असेही सरकारकडून सांगण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेल्थकेअर वर्कफोर्सला तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिनी प्रवाशांची स्थापना 
हाँगकाँग आणि चीनमधून विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग हे १८ जानेवारी रोजीच सुरू झाले होते. ही सगळी प्रक्रिया ३० जानेवारी रोजी भारतात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडण्याच्या बरीच आधीपासून सुरू झाली होती असेही सरकारकडून सांगण्यात आले. 

सलाम तुमच्या कार्याला; संकटात मदत करावी टाटा समूहासारखी!

नॉन एसी डब्यात विलगीकरण वॉर्ड 
कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी भारतीय रेल्वेने वातानुकूलित नसलेल्या डब्यापासून विलगीकरण वॉर्डचे प्रारूप तयार केले आहे. पुढील काही दिवसांमध्ये अशा वॉर्डची संख्या वाढविता येणे शक्य होणार आहे. रेल्वेचा प्रत्येक विभाग प्रत्येक आठवड्यामध्ये अशा दहा डब्यांत विलगीकरण वॉर्ड तयार करू शकतो. पुढे हेच वॉर्ड आवश्‍यकता असणाऱ्या भागांमध्ये पाठविण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे आणीबाणीच्या काळामध्ये या डब्यांचा रूग्णालयासारखा वापर करता येईल.

'लॉकडाऊन'मध्ये काम करणाऱ्यांना 'ही' कंपनी देणार २५ टक्के ज्यादा पगार! 

‘हेल्थ वर्कफोर्स’ने तयार राहावे - मोदी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेल्थकेअर वर्कफोर्सला तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या विविध उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी त्यांनी आज व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधला. आयुष, आयसीएमआर, सीएसआयआर यासारख्या संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा असे मोदींनी म्हटले आहे. गरज पडलीच तर खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचे निर्देशही पंतप्रधानांकडून देण्यात आले आहेत. 

गोवा सरकारला नौदलाची मदत 
गोव्यातील साठ संशयित रूग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यामध्ये तपासणीसाठी आणण्यासाठी भारतीय नौदलाने गोवा सरकारला मदत केली.. हे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये आणण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाच्या डोर्नियर विमानाने हे नमुने पुण्यात आणले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील तंत्रज्ञांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.