esakal | Coronavirus : सौदी अरेबियात अडकले शंभर भारतीय; भारताने घेतला 'हा' निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

saudi arabia

सौदीत अडकलेल्या नागरिकांनी पाठविलेल्या मेलनुसार, या शंभरजणात आपल्या मुलांना भेटायला आलेले वृद्ध आई वडिलांचा समावेश आहे. तसेच अनेकजण बिझनेस व्हिसाधारक असून त्याची मुदतही संपत आली आहे.

Coronavirus : सौदी अरेबियात अडकले शंभर भारतीय; भारताने घेतला 'हा' निर्णय

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनामुळे भारताने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केलेली असताना सौदी अरेबियात अडकलेल्या १०० भारतीय नागरिकांनी काल दिल्लीतल्या पत्रकारांना, परराष्ट्र मंत्रालयाला मेल पाठवून त्यांची लवकर सुटका करावी आणि विशेष विमानाने त्यांना भारतात  आणण्याची विनंती केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सौदीत अडकलेल्या नागरिकांनी पाठविलेल्या मेलनुसार, या शंभरजणात आपल्या मुलांना भेटायला आलेले वृद्ध आई वडिलांचा समावेश आहे. तसेच अनेकजण बिझनेस व्हिसाधारक असून त्याची मुदतही संपत आली आहे.

सौदी अरेबियाच्या प्रस्तावाकडे कानाडोळा
सौदी अरेबियात अडकलेल्या नागरिकांविषयी परराष्ट्र मंत्रालयाकडे विचारणा केली असता लॉकडाउन संपेपर्यंत सरकार परदेशातील भारतीयांना  मायदेशी आणण्याच्या विचारात नसल्याचे सूचित केले. तसेच सौदी अरेबियाने अडकलेल्या भारतीयांसाठी विमान देण्याची ऑफर दिली होती. परंतु तो प्रस्ताव सरकारने मंजूर केला नसल्याचे सूत्राने सांगितले.

Coronavirus : देशात दररोज ५५ हजारांपेक्षा जास्त चाचण्या : डॉ. हर्षवर्धन

काहीजणांचा नोकरीचा करार संपल्याने ते परतण्याच्या तयारीत आहे आणि काहीजण तर विनारोजगार देखील आहेत. देशातल्या विविध भागातील हे नागरिक असले तरी प्रामुख्याने केरळ, आंध्र, तेलंगण, पश्‍चिम बंगाल, तमीळनाडू यातील नागरिकांचा अधिक समावेश आहे. गोवा किंवा बंगलोरच्या अब्दुल हन्नन सुकि(सुक्रि) या नागरिकाचा समावेश असून तोही बिझनेस व्हिसाधारक आहे. सरकारने विशेष विमानाने येथे अडकलेल्यांची सुटका करावी किंवा एखादे जहाज पाठवावे किंवा सौदी अरेबिया आणि भारतादरम्यान व्यापारी मालाची वाहतूक करणाऱ्या जहाजांवर लोकांची सोय करुन त्यांची सुटका करावी अशी  विनंतीही या व्यक्तींनी या मेलमध्ये केलेली आहे.