esakal | मोठी बातमी : ताप, खोकल्याच्या सर्वच रुग्णांची तपासणी होणार; मास्क, सॅनिटायझरची किंमत फिक्स
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus india will check all fever patients mask sanitizer prices fixed

देशातील मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या किमती निश्‍चित केल्या आहेत.

मोठी बातमी : ताप, खोकल्याच्या सर्वच रुग्णांची तपासणी होणार; मास्क, सॅनिटायझरची किंमत फिक्स

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली Coronavirus : देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) चाचणीच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्या नियमान्वये श्‍वसनाचा गंभीर आजार, ताप आणि खोकला असणाऱ्या सर्वच संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. या संदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी कशी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मास्क, सॅनिटाझरच्या किमती निश्‍चित 
देशातील मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्या किमती निश्‍चित केल्या आहेत. मास्कसाठी आता आठ ते दहा रुपये आणि सॅनिटायझरच्या दोनशे मिलि बाटलीसाठी शंभर रुपये मोजावे लागतील, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

आणखी वाचा - कोरोना संदर्भातील दहा महत्च्वाचे अपडेट्स एका क्लिकवर

दूतावास नागरिकांच्या मदतीस धावले 
जगातील विविध देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांशी देशभरातील दूतावासांनी संपर्क साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक दूतावासांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी करत नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइनदेखील सुरू केल्या आहेत. कॅनडा, ग्रीस, फिनलँड, इस्टोनिया, इस्राईल, जपान, व्हिएतनाम, बल्गेरिया, उत्तर मॅसिडोनिया, रशिया, क्युबा, ब्राझील आणि स्वित्झर्लंड आदी देशांतील दूतावासांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

आणखी वाचा - भारतात कोरोना संदर्भात कोठे काय घडले?

रेल्वेचे आवाहन 
तेरा मार्च रोजी दिल्ली ते रामागुंडम दरम्यान संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास केलेल्या आठही प्रवाशांना संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे. प्रवासातून मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरू शकतो, ही बाब लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी अनावश्‍यक प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वेने काउंटरवरून घेतल्या जाणार तिकिटांसाठीच्या परताव्याचे नियम शिथिल केले असून, २१ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान हे नियम लागू असतील. तिकीट रद्द झाल्यानंतर प्रवाशांना शंभर टक्के परतावा मिळू शकेल. 

आणखी वाचा - सलग तिसऱ्या दिवशी चीननं मारली बाजी; वाचा सविस्तर बातमी

कोरोना व्हायरस संदर्भातील घडामोडी 

 • वृंदावनमधील बाँके बिहार मंदिर बंद 
 • श्रीनगरमध्ये मशिदीत प्रार्थना थांबविल्या 
 • लालूप्रसाद यादव एकांतवासात 
 • वाराणसीत ३९ नगरसेवक एकांतवासात 
 • कनिका कपूरविरोधात खटला दाखल 
 • प.बंगालमध्ये बारावीची परीक्षा रद्द 
 • गुजरातमध्ये न्यायालयांतील कर्मचाऱ्यांची संख्या घटविली 
 • कोरोनाचा फटका बसलेल्या कर्जदारांसाठी एसबीआयचे कर्ज 
 • कर्नाटकात आणखी तिघांना बाधा 
 • सुरतमधील हिरे कंपन्यांना टाळे 
 • गोव्यात परराज्यांतील वाहनांना प्रवेश नाही 
 • रोममधील भारतीयांना आणण्यासाठी विमान रवाना 
 • यूपीत ८३ लाख कामगारांना घरून काम करण्याचे आदेश 
 • तमिळनाडूतील कासारगोड लॉकडाऊन 
 • यूपीतील मंत्र्यांसह २८ जण निगेटिव्ह 
 • प्.बंगालमध्ये बटाटे २० टक्क्यांनी महागले 
 • मध्य प्रदेशातील दोन ज्योतिर्लिंग बंद 
 • गुजरातेत आणखी सहा बाधित, रुग्णांची संख्या तेरा 
 • पुरुषाच्या हातावरील शिक्का पाहून राजधानी एक्स्प्रेसमधून दांपत्यास उतरविले 
 • अरुणाचलमधील स्थानिक निवडणुका स्थगित 
 • पंजाबमध्ये आणखी तीन बाधित, रुग्ण संख्या सहा 
 • राजस्थानातही आणखी सहा जणांना संसर्ग 
loading image