esakal | रस्त्यावर फिरण्यासाठी त्याने लढवली शक्कल पण...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus lockdown he struggled get out home and road police taught lesson him at up

देशात कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन असताना काहीजण रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करतात. एकाने रस्त्यावर जाण्यासाठी शक्कल लढवली पण तो पोलिसांच्या जाळ्यात सापडलाच.

रस्त्यावर फिरण्यासाठी त्याने लढवली शक्कल पण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नोएडा (उत्तर प्रदेश): देशात कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन असताना काहीजण रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करतात. एकाने रस्त्यावर जाण्यासाठी शक्कल लढवली पण तो पोलिसांच्या जाळ्यात सापडलाच. अशीच एक मजेशीर घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये समोर आली आहे.

लॉकडाऊन असताना प्रियकर पोहचला तिच्या घरी अन्...

गाझियाबादच्या विजय नगर भागातील एक युवक घराबाहेर पडला आणि रस्त्यावर फिरण्यासाठी बोगस दूधवाला बनला होता. तपासादरम्यान पोलिसांनी अडवून त्याची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान तो खोटे बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दुचाकीवरील दुधाचे कॅन तपासले असता ते गंजलेले आढळून आले. अखेर त्याने फेक दुधवाला बनून फिरत असल्याचे सांगितले.

सामूहिक बलात्कारानंतर ती रांगत-रांगत रस्त्यावर आली...

दरम्यान, पोलिसांनी संबंधित युवकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याची मोटरसायकल जप्त केली आहे. लॉकडाऊन काटेकोरपणे नियम पाळा अन्यथा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दोघांना हॉटेलमध्ये जाताना पाहिले अन्...

loading image
go to top