
तिरुअनंतपुरम : कोरोनाचा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात मागील पाच दिवसांत केरळमध्ये दारू पिण्याचे व्यसन असलेल्या पाच जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लॉकडाउनच्या काळात दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारी राज्यात वाढल्या आहेत. त्यामुळं अशा व्यक्तींना अल्कोहोल घेण्याची गरज असल्यास त्यांना घेऊ द्यावे, असे आदेश राज्या सरकारने दिले आहेत.
Coronavirus : कोरोनामुळं हे बेस्ट झालं; 'या' शहरांनी घेतला मोकाळा श्वास
केरळमधील मलप्पुरममध्ये दारूचे व्यसन असलेल्या दोघांनी शनिवारी आत्महत्या केली. दारूचे व्यसन असलेल्या एकूण पाच जणांनी मागील पाच दिवसांत केरळमध्ये आत्महत्या केली आहे. दरम्यान, व्यसनमुक्ती केंद्रे आणि मनोरुग्णांसाठीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये येणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
दारूबंदीसाठी केरळमध्ये आत्तापर्यंत अनेक मार्गांनी निर्बंध लागण्यात आले होते. मात्र लॉकडाउनमुळे केरळात प्रथमच संपूर्ण दारूबंदीची अंमलबजावणी होत आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले की, राज्यातील महत्त्वाच्या सरकारी रुग्णालयांमध्ये दारूचे व्यसन असलेल्यांवर उपचार करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गंभीर रुग्णांना तालुका किंवा जिल्हा पातळीवरील रुग्णालयांमध्ये पाठविले जात आहे. दारूचे व्यसन असलेल्यांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात २० खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत.
दारूचे व्यसन असलेल्यांच्या समुपदेशनासाठी फोन वरून सल्ला देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मानसिक आरोग्य बिघडलेल्या आणि ज्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे, अशा शंभर व्यक्ती आम्ही शोधल्या आहेत. खासगी व्यसनमुक्ती केंद्रांचीही सध्या मदत घेतली जात आहे.
- डी. राजीव, सीईओ, व्यसनमुक्ती कार्यक्रम, केरळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.