esakal | 'लॉकडाऊन' चक्क हसू लागलाय...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus migrant couple stranded tripura names their newborn lockdown

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनदरम्यान विविध घडामोडी घडताना दिसत असून, एका मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. तो आता हसू लागला आहे.

'लॉकडाऊन' चक्क हसू लागलाय...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बधरघाट (राजस्थान): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनदरम्यान विविध घडामोडी घडताना दिसत असून, एका मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. तो आता हसू लागला आहे.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेकजण जन्मलेल्यांची नावे कोरोना, लॉकडाऊन ठेवताना दिसत आहेत. राजस्थानच्या अलवारमधून संजय बौरी आणि मंजू बौरी हे दांपत्य कामासाठी त्रिपुरामध्ये आले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे ते त्रिपुरामध्ये अडकून पडले आहे. यादरम्यान त्यांना मुलगा झाला. एका अधिकाऱयाने त्या बाळाचे नाव लॉकडाऊन ठेवण्याचा सल्ला दिला. दांपत्यानेही त्याचे नाव लॉकडाऊन ठेवले. बाळाला लॉकडाऊन म्हणून आवाज दिल्यानंतर ते हसू लागले आहे. यामुळे दांपत्याच्या चेहऱयावर हसू दिसत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला लॉकडाऊन दरम्यान मुलगा झाला. म्हणून या जोडप्याने आपल्या मुलाचं नाव 'लॉकडाऊन' असे ठेवले आहे. महाराष्ट्रामध्येही एका वासराचे नाव कोरोना ठेवण्यात आले आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 19,000 वर पोहोचली असून, हा आकडा सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 640 जणांचा मृत्यू झाला आहे.

...आणि तहसीलदारांच्या डोळ्यात टचकण पाणी आलं