esakal | दुसऱ्या लाटेचा काही राज्यांवर शून्य परिणाम; आहेत 500 हूनही कमी ऍक्टीव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus second wave not impactful in some indian states less than 500 active cases

देशातील काही राज्ये असेदेखील असे आहेत, ज्याठिकाणी कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा काही खास फरक पडला नाहीये.

दुसऱ्या लाटेचा काही राज्यांवर शून्य परिणाम; आहेत 500 हूनही कमी ऍक्टीव्ह रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आता झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 1.84 लाख लोकांना कोरोना संक्रमणाने बाधित झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 1 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांत सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमधली ही सर्वाधित संख्या आहे. अगदी काही आठवड्यांपूर्वीच देशामध्ये कोरोनाच्या ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या घटून निव्वळ 1.5 लाखांवर घसरली होती. मात्र, आता तोच ऍक्टीव्ह रुग्णांचा आकडा 13 लाखांच्या पार गेला आहे. मात्र, देशातील 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आता देखील असे आहेत, ज्याठिकाणी कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा काही खास फरक पडला नाहीये. या राज्यांमधील रुग्णांची संख्या अद्यापही 500 च्या आसपासच आहे. 


या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण
सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र  हे राज्य सर्वाधिक आघाडीवर आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सुमारे 50 ते 60 हजार रुग्ण संक्रमित आढळून येत आहेत. तर राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या आता जवळपास 6 लाखांपर्यंत पोहोचली आहे. कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे आतापर्यंत राज्यामध्ये 58 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऍक्टीव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये छत्तीसगढ सध्या दुसऱ्या स्थानी आहे. या ठिकाणी 1,09,139 रुग्ण ऍक्टीव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उत्तर प्रदेश सध्या ऍक्टीव्ह रुग्णांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी असून 95,980 रुग्ण सध्या ऍक्टीव्ह आहेत. यानंतर कर्नाटकमध्ये 78,636, केरळमध्ये 52,450, तमिळनाडूमध्ये 49,985, मध्य प्रदेशमध्ये 43,539, दिल्लीमध्ये 43,510, राजस्थानमध्ये 40,690, गुजरातमध्ये 34,555, पश्चिम बंगालमध्ये 29,050, पंजाबमध्ये 28,184, आंध्र प्रदेशमध्ये 25,850, तेलंगणामध्ये 25,459 आणि हरियाणामध्ये 24,207 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा - केंद्राला घ्यावा लागणार कठोर निर्णय; 15 दिवसांत महाराष्ट्रासह कर्नाटक, यूपीमध्येही स्फोट
या राज्यात आहे कमी रुग्ण
पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेत देखील अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या 500 पेक्षाही कमी आहे. यामध्ये नॉर्थ इस्टच्या अनेक राज्यांच्या समावेश होतो. अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या कोरोनाचे केवळ 55 रुग्ण आहेत, तर लक्षद्वीपमध्ये 86 आहेत. त्यानंतर अंदमान-निकोबार आयलंडवर सध्या 93 ऍक्टीव्ह केसेस आहेत. मणिपूरमध्ये 118, नागालँडमध्ये 174 आणि सिक्कीममध्ये 175 रुग्णांवर उपचार सुरु आहे. याशिवाय मिझोराममध्ये 204, मेघालयमध्ये 270 तर त्रिपुरामध्ये 312 ऍक्टीव्ह केसेस आहेत.

loading image