देशात कोरोना रुग्ण वाढले; जाणून घ्या परिस्थिती आणि हेल्पलाईननंबर

coronavirus toll free number india updates information marathi
coronavirus toll free number india updates information marathi

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा फैलाव होण्याचा वेग इतर देशांच्या तुलनेत कमी असला तरी, तो थांबलेला नाही. भारतात आज, सायंकाळपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 200च्या पलिकडे गेली आहे. त्यात 32 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशातील 20 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनानं प्रवेश केला असून, एकूण 223 जणांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळं देशात चिंतेचं वातावरण असलं तरी, केंद्र आणि राज्य सरकारने संसर्ग वाढू नये म्हणून, काही कठोर पावले उचलत आहेत. देशातील 7 राज्ये अशी आहेत जिथं, कोरोनाचे 15 आणि त्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (52) आहेत.

टोल फ्री नंबर काय?
देशात आज दुपारीच कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 200च्या वर गेली त्यामुळं केंद्र सरकारनं त्याची गंभीर दखल घेत. ठिकठिकाणी जमाव बंदीचे आदेश देण्याच्या सूचना केल्या आहेत. दिल्लीत 31 मार्चपर्यंत मॉल्स आणि रेस्टॉरंट्स बंद राहणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्याची घोषणा केली तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, महाराष्ट्रातील चार शहरे 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा इशारा दिलाय. यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. दरम्यान, आज केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव लव अगरवार यांनी, नागरिकांना टोल फ्री नंबर वापरण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाशी संबंधित माहिती घेण्यासाठी आणि देण्यासाठी 1057 हा टोल फ्री नंबर जाहीर करण्यात आला आहे. देशातील नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत कोरोनाशी संबंधित चुकीची किंवा अर्धवट माहिती शेअर करू नये, असं आवाहन अगरवाल यांनी केले आहे.

कोरोनाची देशातील स्थिती

  • कोरोनातून बरा झाल्याचा दावा करणाऱ्या इटालियन व्यक्तीचा जयपूरमध्ये मृत्यू
  • उत्तर प्रदेशमधील बाधितांची संख्या २३ वर; लखनौमधील सर्व हॉटेल, बार आणि ब्यूटी पार्लरची दुकाने बंद
  • परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला यांनी भारत-प्रशांत प्रदेशातील देशांना भारत करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली
  • जम्मू-काश्‍मीरमधील सर्व व्यवहार बंद
  • चाचणीसाठी सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याचे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे जनतेला आवाहन
  • ‘जेएनयू’मधील विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश
  • कोरोना झालेल्या आपल्या मुलाला सरकारी विश्रांतिगृहात ठेवल्याबद्दल रेल्वेच्या महिला अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
  • दिल्लीत कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश
  • अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर
  • उपचारादरम्यान पळून गेलेल्या संशयित महिलेविरुद्ध पंजाबमध्ये गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com