कोरोनाच्या संभाव्य धोक्याबद्दल WHO ने केली तीन शक्यतांवर चर्चा

Tedros Adhanom Ghebreyesus
Tedros Adhanom GhebreyesusTedros Adhanom Ghebreyesus

नवी दिल्ली : कोरोनामुळे (coronavirus) महाराष्ट्रावर लादलेले सर्व निर्बंध आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. ३१) हटवले. यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांनी मास्क घालणेही ऐच्छिक असल्याचे सांगितले आहे. कारण, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालेली आहे. असे असताना कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे.

देशात कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या चांगलीच कमी झालेली आहे. असे असले तरी चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनपासून बनलेल्या डेल्टाक्रॉन विषाणूपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला जात आहे. यामुळे आतातरी कोरोनापासून मुक्ती मिळणार का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होत आहे. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने तीन शक्यतांवर चर्चा केली. यातून अधिक वेगाने पसरणारे प्रकार येऊ शकतात, अशी म्हटले जात आहे.

Tedros Adhanom Ghebreyesus
नितीन गडकरींच्या विधानानंतर लोकसभेत हशा पिकला; म्हणाले...

कोरोनाच्या (coronavirus) बाबतीत २०२२ हे वर्ष लोकांना दिलासा देऊन जाईल, अशी आशा अनेक शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचवेळी डब्ल्यूएचओचा असा विश्वास आहे की, भविष्यात लोकांमध्ये निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे रोगाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा सामना कसा करायचा यासंबंधी एक अद्यतन योजना जारी केली आहे. हे शेवटचे ठरेल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिकारशक्तीमुळे धोका कमी होऊ शकतो

कोरोना व्हायरमध्ये बदल होऊ शकतो. लस आणि प्रतिकारशक्तीमुळे (Immunity) रोगाचा धोका कमी होऊ शकतो. तसेच कमी प्रतिकारशक्तीमुळे प्रकरणे वाढू शकतात आणि मृत्यूची संख्याही वाढू शकते. यामुळे असुरक्षित लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता पडू शकते. नवीन प्रकारच्या लसींची गरज पडणार नाही, असेही टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले.

Tedros Adhanom Ghebreyesus
सोनिया गांधींचा PM मोदींना टोमणा, म्हणाल्या...

वाईट पेक्षा वाईट होऊ शकते

अधिक धोकादायक आणि वेगाने पसरणारा प्रकार येऊ शकतो. या नवीन प्रकाराशी लढण्यासाठी लस आणि रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमी पडू शकते. अशा परिस्थितीत सध्या उपलब्ध असलेल्या लसीमध्ये बदल करावे लागतील. तसेच ज्यांना धोका आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. गेल्या आठवड्यात दहा दशलक्षाहून अधिक प्रकरणे आणि ४५,००० नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, असे डब्ल्यूएचओच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com