वादळ चाचणी केंद्र रोखणार विजांची हानी;ओडिशातील बालोसारमध्ये देशातील पहिले केंद्र उभारणार

पीटीआय
Saturday, 6 February 2021

हवामान खात्यासह डीआरडीओ आणि इस्रोचे बालासोरमध्ये विभाग आहेत. बालासोरच्या नजीकच्या परिसरात वेधशाळा उभारल्या जातील. त्याचप्रमाणे, चाचणी केंद्रावरून वादळांचा अभ्यास केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भुवनेश्वर - विजांच्या कडकडाटासह येणाऱ्या वादळामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होते. या पार्श्वभूमीवर ओडिशातील बालासोर येथे देशातील पहिले वादळ संशोधन व चाचणी केंद्र (टेस्टबेड) उभारण्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) केली आहे. विजा कोसळून होणारी जीवित व वित्तहानी कमी करण्याचा हे केंद्र उभारण्यामागचा हेतू आहे.

या केंद्राच्या माध्यमातून विविध प्रयोगांसाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, की बालासोरमधील हे केंद्र भारतीय हवामान खाते, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येईल.  

कोरोनामुळे आर्थिक परवड; झोपडपट्टीवासियांनी सुरु केली स्वत:चीच बँक

या केंद्राप्रमाणेच मध्य प्रदेशात भोपाळ येथे मॉन्सून काळातील संशोधनासाठी पहिले केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. हे दोन्ही प्रकल्प अद्याप नियोजनाच्या टप्प्यावर असून प्रकल्पांचा सविस्तर अहवाल तयार केला जात आहे. हवामान खात्यासह डीआरडीओ आणि इस्रोचे बालासोरमध्ये विभाग आहेत. बालासोरच्या नजीकच्या परिसरात वेधशाळा उभारल्या जातील. त्याचप्रमाणे, चाचणी केंद्रावरून वादळांचा अभ्यास केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांसाठी कायपण! अमेरिकेतील NBA स्टार खेळाडूने केली आर्थिक मदत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: country first center will be set up at Balosar in Odisha