देशाला चार राजधान्या हव्यात - ममता बॅनर्जी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 24 January 2021

देशाची संघराज्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी चार फिरत्या राजधान्यांची निर्मिती करण्यात यावी तसेच प्रत्येक ठिकाणी एकदा तरी संसदेचे अधिवेशन घेतले जावे. कधीकाळी कोलकत्यामध्ये राहून इंग्रजांनी सगळ्या देशावर राज्य केले होते, एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाला एकच राजधानी का?  असा सवाल करतानाच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारसमोर नवा प्रस्ताव मांडला.

कोलकता - देशाची संघराज्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी चार फिरत्या राजधान्यांची निर्मिती करण्यात यावी तसेच प्रत्येक ठिकाणी एकदा तरी संसदेचे अधिवेशन घेतले जावे. कधीकाळी कोलकत्यामध्ये राहून इंग्रजांनी सगळ्या देशावर राज्य केले होते, एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाला एकच राजधानी का?  असा सवाल करतानाच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारसमोर नवा प्रस्ताव मांडला. भाजपने मात्र ममतांची ही मागणी वास्तवाला धरून नसल्याचे सांगत ती फेटाळून लावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस असणाऱ्या २३ जानेवारीला राष्ट्रीय सुटी जाहीर केली जावी तसेच हा दिवस पराक्रम दिन म्हणून साजरा करण्याऐवजी तो देशप्रेम दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. नेताजींच्या जयंतीनिमित्त तृणमूल काँग्रेसने आज ममतांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोलकत्यातील शामबझार भागातील नेताजींच्या पुतळ्यापासून रेड रोडपर्यंत पदयात्रा काढली होती.  यामध्ये तृणमूलचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ममतांनी रेड रोड भागामध्ये नेताजींच्या पुतळ्याजवळच जाहीरसभा घेत या पदयात्रेची सांगता केली. या कार्यक्रमानिमित्त ममतांनी मोदींवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. केंद्राच्या सबका साथ, सबका विकास या घोषणेचा समाचार घेताना त्या म्हणाल्या की, नेताजींनी स्थापन केलेली इंडियन नॅशनल आर्मी ही खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व करणारी संघटना होती. केंद्राने योजना आयोगाचे नाव बदलून ते नीती आयोग असे करून नेताजींचा अवमानच केला आहे.

लालू प्रसाद यांच्यावर दिल्लीत ‘एम्स’मध्ये उपचार

ममता म्हणाल्या

  • फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न
  • माझी लढाई ही सगळ्या देशासाठी आहे
  • नीती आयोगाचे नाव पुन्हा योजना आयोग करा
  • नेताजींना देशाचे नायक घोषित करा
  • भाजपला राज्याचा इतिहास बदलायचा आहे
  • निवडणुकीमुळे भाजपला नेताजींची आठवण

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीचं नुकसान किती? ते राज-उद्धव आणि मोदी-ममतादीदी एका स्टेजवर

आझाद हिंद फौजेच्या सन्मानार्थ राजरहाट भागामध्ये  स्मारक उभारले जाणार असून राज्य सरकारच्या अनुदानातून नेताजींच्या स्मरणार्थ एक विद्यापीठ देखील येथे उभारण्यात येईल. यंदा प्रजासत्ताक दिनी कोलकत्यामध्ये होणारा कार्यक्रम हा पूर्णपणे नेताजींना समर्पित असेल.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्‍चिम बंगाल

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: country needs four capitals mamta banerjee