देशातील वनक्षेत्र वाढले; कर्नाटक, आंध्र आणि केरळात सर्वाधिक वाढ

Forest-Area
Forest-Area

नवी दिल्ली - देशातील वनक्षेत्रात आणि वृक्षाच्छादित क्षेत्रात ५१८८ चौरस किलोमीटरने वाढ झाली असून, खारफुटीचे क्षेत्रफळदेखील वाढल्याचे ‘इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-२०१९’ या वनसर्वेक्षण अहवालातून दिसून आले आहे. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वन सर्वेक्षण अहवालाचे आज प्रकाशन झाले.

जगात मोजक्‍या देशांमध्ये वनक्षेत्र वाढले असून, त्यात भारताचाही समावेश आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत १३ हजार चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्र वाढले आहे. देशात आजमितीस वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.७३ दशलक्ष हेक्‍टरवर पोचले आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २५.५६ टक्के आहे. भारतात घनदाट जंगल, मध्यम आणि खुले जंगलाचे क्षेत्रफळही वाढले आहे.

देशात सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे. या तीन राज्यांचे वनक्षेत्र वाढीचे प्रमाण अनुक्रमे १०२५ चौरस किलोमीटर, ९९० चौरस किलोमीटर, ८२३ चौरस किलोमीटर असे आहे. यासोबतच जम्मू-काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशच्या वनक्षेत्रामध्ये मागील दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. 

वृक्षाच्छादित क्षेत्र वाढण्यात महाराष्ट्राची कामगिरी महत्त्वाची आहे. आंबा, बोरी आणि डाळिंबाची दरवर्षी एक कोटी झाडे लावली जातात. ती ९५ टक्के वाढतात. ही योजना लागू होऊन १८ वर्षे झाली असून, महाराष्ट्रात १८ कोटी झाडे लागली आहेत. याचे अनुकरण अन्य राज्यांनीही करावे, असे आवाहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या वेळी केले. सागरी पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटी जंगलांचे क्षेत्रफळ ५४ चौरस किलोमीटरने वाढले आहे. देशात एकूण खारफुटीचे जंगल ४९७५ चौरस किलोमीटर झाले आहे. २०१७ च्या तुलनेत वाढ झाली असल्याकडेही जावडेकर यांनी लक्ष वेधले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com