भाड्याच्या घरात सुरु होता वेश्याव्यवसाय; घरमालकाबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

वेश्या व्यवसायाबाबतच्या एका महत्त्वाच्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे.
Karnataka High Court
Karnataka High Courtसकाळ डिजिटल टीम

भाड्याने दिलेल्या जागेत वेश्याव्यवसाय चालवला जात असेल आणि याची माहिती घरमालकाला नसेल तर त्याच्यावर मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करता येणार नाही, असा महत्त्वपुर्ण निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) दिलाय. वेश्या व्यवसायाबाबतच्या (Prostitution Racket) एका महत्त्वाच्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे.

Karnataka High Court
LIVE : परबांच्या रिसॉर्टवर पडणार हातोडा? सोमय्या दापोलीकडे रवाना

नगरभवी येथील रहीवासी घरमालकाने डिसेंबर 2019 मध्ये त्याचे घर भाड्याने दिले होते. चंद्रा लेआउट पोलिसांनी जानेवारी 2020 मध्ये घरावर छापा टाकला होता, त्यावेळी त्यांनी वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यानंतर त्यांनी घरमालक प्रभुराज यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.

हा एफआर रद्द करण्यासाठी प्रभुराज यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यावर भाड्याने दिलेल्या जागेत वेश्याव्यवसाय चालवला जात असेल आणि याची माहिती घरमालकाला नसेल तर त्याच्यावर कारवाई करता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलाय. सोबतच या प्रकरणात जर घरमालकावर गुन्हा नोंदवला गेला तर हा प्रकार कायद्याचा गैरवापर ठरेल, असे न्यायालयाने म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com