'भारतातील धोकादायक स्ट्रेनवर कोव्हॅक्‍सिन प्रभावी'

'कोव्हॅक्‍सिन'
'कोव्हॅक्‍सिन'

Bharat Biotech Covaxin Vaccine : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. मृतांच्या संख्येतही मोठी वाढ दिसत आहे. त्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. अशा परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण वेगानं सुरु आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होऊ शकता असं तज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. भारतात आढळलेल्या नव्या व्हेरियंटमुळे (coronavirus strains found in India) नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर कोणती लस प्रभावी ठरतेय, यावरून प्रश्न विचारले जात होते. भारत आणि ब्रिटनमधील धोकादायक डबल म्युंटेट व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन (Covaxin) लस प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेक कंपनीनं केला आहे. हैदराबाद येथील लस उत्पादक कंपनी भारत बायोटकनं यासाठी एका प्रसिद्ध मेडिकल जर्नलमधील प्रकाशित झालेल्या अहवालाचा दाखला दिला आहे. (Covaxin effective against coronavirus strains found in India, UK: Bharat Biotech)

कोव्हॅक्सिनवर झालेलं संशोधऩ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हयरोलॉली आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या संयुक्त विद्यामानानं झालं आहे. कोरोना लसीकरणादरम्यान भारतात आणि ब्रिटनमध्ये 1.617 आणि 1.1.7 हे दोन नवीन व्हेरियंट आढळले आहेत. या दोन्ही व्हेरियंटसह इतर व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन (Covaxin) प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

'कोव्हॅक्‍सिन'
'सीरम'पाठोपाठ 'भारत बायोटेक'नेही कमी केली कोरोना लशीची किंमत

कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा इल्ला (suchitra ella) यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, 'कोव्हॅक्‍सिनला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे, प्रकाशित वैज्ञानिक संशोधन आकडेवारीनुसार कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस नवीन स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे दर्शवते. ' सुचित्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालयासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना टॅग केले आहे.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार, भारत बायोटेक कंपनी एक मे 2021 पासून राज्यांना लसीचा पुरवठा करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात होणारी लस निर्मितीमधील 50 टक्के हिस्सा केंद्राला तर उरलेला 50 टक्के हिस्सा राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विक्रीचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com