कोरोना रुग्णसंख्येचा वेग पाहता पुढील दोन आठवडे निर्णायक; तज्ज्ञांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

omicron variant

कोरोना रुग्णसंख्येचा वेग पाहता पुढील दोन आठवडे निर्णायक; तज्ज्ञांचा इशारा

नवी दिल्ली : भारतात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होत आहे, संसर्गाचा हा वेग पाहता पुढील दोन आठवडे निर्णायक ठरतील, असा इशारा दिल्लीतील तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहनंही या डॉक्टरांनी केल्याचं, एएआयनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. (Be vigilant COVID 19 cases are doubling each day next 2 weeks are crucial Expert)

हेही वाचा: "मोदींचा ताफा अडवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी जनतेची माफी मागावी"

दिल्लतील व्यंकटेश्वर रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर आशिष खट्टर म्हणाले, "प्रत्येक दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होत असून रुग्णांमध्ये सौम्य लक्षण आहेत. पण रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज भासत नाहीए. गेल्या तीन दिवसात आपण रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याचं पाहतोय य़ावरुन जानेवारी महिन्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणावर लोकांना संसर्ग होण्याचा धोका आहे"

हेही वाचा: कोरोनाची धास्ती; मंत्रालयातील बायोमेट्रिक तात्पुरती बंद

सध्याच्या संसर्गामुळं रुग्णांमध्ये अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्याचं पहायला मिळत आहे. लोक ताप, सर्दी, घसादुखी आणि खोकल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. गेल्या चार-पाच दिवसात आम्ही अशा प्रकारचे ६०-७० रुग्ण पाहिले आहेत. पण यांपैकी एकानंही श्वासाचा त्रास होत असल्याची तक्रार केलेली नाही. यांपैकी आम्हाला एखाद्यालाच अॅडमिट करुन घ्यावं लागलं आहे, असंही डॉक्टरांनी म्हटलंय.

हेही वाचा: इस्त्रायलची सुरक्षा करतंय अदृश्य कवच; कसं?

कोरोनाचा संसर्ग झालेले बरेच रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये असून व्यवस्थित बरे होत आहेत. त्यामुळं दुसऱ्या लाटेच्या तुलनेत रुग्णांचं रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. एकानंही आमच्याकडे प्रकृती खूपच ढासाळल्याची तक्रार केलेली नाही. पण असं असलं तरी लोकांनी कोविडच्या नियमावलींचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. लोकांनी N95 मास्कचं वापरण्याची गरज नाही पण डबल मास्क नक्कीच वापरावं असा सल्लाही डॉ. खट्टर यांनी नागरिकांना दिला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top