देशातील १५ जिल्हे रेड झोन, महाराष्ट्रातील २ जिल्ह्यांचा समावेश

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याचे चित्र समोर आले आहे.
covid -19
covid -19sakal

देशात अजूनही कोरोना संकटाचे गडद सावट दिसत आहे. दररोज देशाभरात दोन लाखांपेक्षा अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडताना दिसत आहे. शुक्रवारी (२९) देशात 2,51,209 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 627 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमावावा लागला आहे. (Covid -19) सध्या देशात कोरोना संक्रमणाचा दर 15.88 टक्के असून केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या सात दिवसांमध्ये देशातील 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग मोठा आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये सात जिल्हे हे दक्षिण भारतातील आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) दोन जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राज्यात अजूनही कोरोनाचे भय दिसत आहे. (Corona In India)

covid -19
यूपीत पुन्हा योगी सरकार, पंजाब-गोव्यात कोणता पक्ष मारणार बाजी?

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केरळ (keral) राज्यातील काही जिल्ह्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढीचा वेग आहे. राज्याच्या सहा जिल्ह्यांत कोरोना रुग्णांती संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यातील प्रत्येकी दोन जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. तर कर्नाटक (Karnataka) आणि राजस्थानमधील प्रत्येकी एका जिल्ह्यांत कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

21 ते 27 जानेवारी यादरम्यान 15 जिल्ह्यातील रुग्णसंख्या

  • बंगळुरू शहर - 1,43,960

  • पुणे -75,592

  • एर्नाकुलम - 55,693

  • तपुरम - 46,570

  • अहमदाबाद - 44,666

  • चेन्नई - 30,218

  • नागपूर - 28,326

  • कोझीकोड - 27,229

  • थिरिसूर - 25,822

  • कोयंबटूर - 25,751

  • कोल्लम - 23,191

  • वडोदरा - 22,021

  • कोट्टायम - 20,730

  • गुरुग्राम - 19,727

  • जयपूर - 19,289

covid -19
ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसणार, हवामान खात्याचा 'या' राज्यांना अलर्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com