esakal | Covid Update - कोरोनाने देशात घेतले 1 लाख बळी; एकूण रुग्ण 64 लाखांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

नव्या रुग्णांसह आता देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ही 64 लाख 73 हजार 545 वर पोहोचली आहे.

Covid Update - कोरोनाने देशात घेतले 1 लाख बळी; एकूण रुग्ण 64 लाखांवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात शुक्रवारी कोविड-19 मुळे मरणाऱ्या रुग्णांच्या संख्येने एका लाखांचा टप्पा पार केला आहे. तर आजपर्यंत कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांची एकूण संख्या ही 64 लाखांहून अधिक झाली आहे. यापैकी 54 लाख 27 हजार 707 लोक हे या प्रादुर्भावातून मुक्त झाले आहेत. केंद्रिय आरोग्य मंत्रालय दररोज सकाळी आठ वाजता ताजी आकडेवारी जाहिर करते. मंत्रालयाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 79,476 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह आता देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ही 64 लाख 73 हजार 545 वर पोहोचली आहे. तर, गेल्या 24 तासात 1069 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या संख्येसह आतापर्यंत 1 लाख 842 मृत्यू कोरोनामुळे झाले. 

रात्री, पीटीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड-19 चे 64 लाख 64 हजार 12 इतके रुग्ण झाले आहेत. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत एक लाख 768 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 हेही वाचा - देशातील तब्बल एवढ्या राज्यांत होतेय दलितांची घुसमट; एनसीआरबीची धक्कादायक माहिती

या प्रादुर्भावातून आतापर्यंत 54 लाख 15 हजार 197 लोक बरे झाले आहेत. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातील जमा झालेल्या आकडेवारीला संकलित करुन ही आकडेवारी मांडली गेली आहे.

जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून बरे होणाच्या निकषामध्ये भारत सर्वांत वरच्या स्थानावर आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार, कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. तर मृतांच्या आकडेवारीच्या निकषानुसार अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! पोलिसांनी तक्रार न घेतल्यानं सामूहिक बलात्कार पीडितेची आत्महत्या; 3 आरोपींना अटक
देशात आतापर्यंत एकूण 7 कोटी 78 लाख 50 हजार 403 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 2 ऑक्टोबरला जवळपास 11 लाख 32 हजार 675 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जितके रुग्ण होते त्याहून अधिक रुग्ण गेल्या आठवड्याभरात कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिकव्हरी झालेल्या रुग्णांची संख्या आहे.