गोलंदाज मोहंमद शमीला धमकावत घरात घुसू पाहणारे चारजण गजाआड

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

दुचाकीस्वाराने थेट शमीला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. बराच वेळ हा वाद सुरू होता.

कोलकता : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमी याच्या जाधवपूर येथील घराबाहेर काही समाजकंटकांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्याला धमक्या दिल्या. घराच्या बाहेर निघाला तर धडा शिकवू अशा धमक्या देणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

मोहंमद शमी शनिवारी रात्री त्याची पत्नी आणि मुलगीसोबत बाहेरून घरी परतत होता. त्याचवेळी कार पार्क करत असताना एका दुचाकीस्वार आणि शमीचा चालक यांच्यात बाचाबाची झाली. संबंधित दुचाकीस्वाराने थेट शमीला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. बराच वेळ हा वाद सुरू होता. त्यानंतर दुचाकीस्वार पुन्हा काही वेळाने तीनजणांना घेऊन आला आणि शमी राहत असलेल्या सोसायटीत आले.

ते चौघे शमीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने त्यांना रोखले. मात्र, त्यांनी त्या सुरक्षा रक्षकालाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. शमीच्या घरात घुसता न आल्याने ते माघारी परतले. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. शमीची पत्नी हसीन जहाँ यांनी जाधवपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानंतर ताबडतोब या चौघांना पोलिसांनी अटक केली. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: cricket news sports news mohammad shami abusers arrested