esakal | Video: एअरपोर्टवर धरला ठेका क्रिकटपटूच्या होणाऱया बायकोने
sakal

बोलून बातमी शोधा

cricketer yuzvendra chahal fiance dhanashree verma dances at airport in ppe suit video viral

भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलचा साखरपुडा झाला असून, त्याच्या होणाऱया बायकोने विमानतळावर पीपीई सूट घालून डान्स केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: एअरपोर्टवर धरला ठेका क्रिकटपटूच्या होणाऱया बायकोने

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलचा साखरपुडा झाला असून, त्याच्या होणाऱया बायकोने विमानतळावर पीपीई सूट घालून डान्स केला आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: कोरोना योद्ध्यांना कडक सॅल्यूट!

युजवेंद्रच्या होणाऱया बायकोचे नाव धमश्री वर्मा आहे. धनश्री कोरिओग्राफर आहे. धनश्री वर्मा एक यूट्यूबर असून डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. तिची स्वत:ची धनश्री वर्मा नावाची कंपनीही आहे. धनश्री वर्मा बॉलिवूड गाण्यांवर डान्स करते. याशिवाय तिने हिपहॉपचेही प्रशिक्षणही घेतले आहे. तिच्या यूट्यूब चॅनलला 1.5 मिलिअन सबस्क्रायबर आहे. आपल्या चॅनेलवर तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. साखरपूड्यानंतर धनश्री चर्चेत आली असून, तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. विमानतळावर धनश्री पीपीई सूट घालून एका पंजाबी गाण्यावर डान्स करत आहे. विमानतळावरील वेटिंग लाऊंजमध्ये तिने डान्स शूट केला असून, व्हायरल केला आहे.

दरम्यान, युजवेंद्र चहलने 8  ऑगस्ट रोजी धनश्रीसोबत झालेल्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल केले होते. कोरोना काळात झालेल्या या छोटेखानी सोहळ्यात या दाम्पत्याचे कुटुंबीय उपस्थित होते. साखरपुडा झाल्यानंतर अनेकांनी दोघांचे अभिनंदन केले आहे.

जेसीबी चालकाचे होतेय कौतुक; व्हिडिओ पाहाच...