Crime News : मुलीच्या हत्येप्रकरणी पिता-पुत्र गेले तुरुंगात, ती निघाली जिवंत, मग तो मृतदेह कोणाचा होता...

Crime News
Crime News

मध्यप्रदेशमधील छिंदवाडतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तिची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी पिता-पुत्राला मुलीच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. दरम्यान ज्या मुलीच्या हत्या झाली होती ती मुलगी जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. ती तिच्या घरी परत आली आहे.

कुटुंबियांचा राग मनात धरून ती निघून गेली आणि आता उज्जैनमध्ये राहते, असे त्या मुलीचे म्हणणे आहे. वडील आणि भावाला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. या प्रकरणात, मुलीचे वडील एक वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर घरी आले, परंतु तिचा भाऊ अजूनही तुरुंगात आहे. (Crime News)

घरी परत आलेल्या युवतीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, मला माहित नाही की कोणाचा मृतदेह माझा मृतदेह म्हणून दाखवला गेला आणि पोस्टमॉर्टम केले गेले. तसेच हत्येच्या आरोपाखाली वडील आणि भावाला तुरुंगात पाठवण्यात आले.

हे प्रकरण अमरवाडा स्टेशनच्या सिंगोडी चौकीतील आहे. या क्षेत्रातील जोपनाला गावातील शन्नू उइके यांची १५ वर्षीय मुलगी २०१४ मध्ये अचानक बेपत्ता झाली होती. त्यांनतर मुलीचा खूप शोध घेतला पण ती मिळाली नाही. यावेळी पोलिसांनी चौकशीचा भाग म्हणून शन्नू उइके यांचे घर खोदले होते.त्यादरम्यान सांगाडा आणि बांगड्या सापडल्या होत्या.

Crime News
Jalgaon : मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी! ४ जखमी, ४५ जण ताब्यात

सुनावणीदरम्यान पिता-पुत्रानेही अल्पवयीन मुलीच्या हत्येची कबुली दिली होती. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पिता-पुत्राची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तब्बल वर्षभरानंतर वडील जामिनावर बाहेर आले, पण मुलगा सोनू अजूनही तुरुंगात आहे.

मृत म्हटली जाणारी कांचन जिवंत

दरम्यान पोलिसांनी मृत घोषित केलेली अल्पवयीन मुलगी जिवंत तिच्या घरी परतली आहे. तिचे लग्नही झाले आहे. ती सध्या उज्जैन येथे राहते. वर्षांनंतर ती घरी पोहोचली तेव्हा गावात खळबळ उडाली. त्याचवेळी आई-वडिलांनी आपल्या मुलीला जिवंत पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुटुंबाजवळ आल्यानंतर कांचनही भावूक झाली.

Crime News
Hate Speech Case: 'जनता शिंदे सरकारला नपुंसक म्हणतेय, काल कोर्टानंही...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com