धक्कादायक! बर्थडे पार्टीला बोलवून त्यानं 20 मुलांना ठेवलं डांबून

वृत्तसंस्था
Thursday, 30 January 2020

माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले. जवळ आले तर घर उडवून लावण्याची धमकी त्याने दिली. 10 ते 12 वर्षे वयोगटातील मुले असल्याने पोलिस आणि गावकरी जोखीम घ्यायला तयार नव्हते.

फरुखाबाद (उत्तर प्रदेश) : वाढदिवसाच्या पार्टीला बोलावल्यानंतर त्यांना घरात ओलीस ठेवल्याची घटना उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यात घडली आहे. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली असून, माथेफिरुने पोलिसांवर गोळीबारही केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सायंकाळी पाच वाजल्यापासून हे ओलीस नाट्य सुरू आहे. पोलिसांनी मुलांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माथेफिरूने पोलिसांवर ग्रेनेड फेकल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं मुलांच्या सुटकेसाठी एटीएसची कमांडो पथक बोलवण्यात आलं आहे. 

- तरुणांनो, सरकारी नोकरी हवीय? 'या' विभागात आहेत 5 लाख रिक्त जागा!

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी, फरुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद कोतवाली क्षेत्रातील कथरिया या गावातील सुभाष गौतम याच्या मुलीचा आज वाढदिवस होता. त्यासाठी आजूबाजूची 20 मुले वाढदिवसासाठी आली होती. मुलीचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर सुभाषने अचानक सर्व मुलांना घरातील तळघरात कोंडले आणि घराच्या गच्चीवर चढला आणि जोरजोराने ओरडू लागला. आजूबाजूंच्या लोकांनी एकत्र येत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने समजावण्यास आलेल्या मित्रावरच गावठी बंदुकीतून गोळीबार केला.

- Delhi Election 2020 : 'भारतीय मुस्लिमांना देशाबाहेर काढणे तर...'; राजनाथ सिंहांचे मोठे वक्तव्य

माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले. जवळ आले तर घर उडवून लावण्याची धमकी त्याने दिली. 10 ते 12 वर्षे वयोगटातील मुले असल्याने पोलिस आणि गावकरी जोखीम घ्यायला तयार नव्हते. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. सुभाष गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर चोरी, लूटमारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. रात्री उशिरापर्यंत ओलीसनाट्य सुरूच होते.

- #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये!

त्यानंतर, माथेफिरुने हॅण्डबॉम्ब फेकल्याने तेथील भिंत कोसळली. त्यामध्ये दोन पोलीस जखमी झाले. ओलीस ठेवण्यात आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी एटीएसच्या कमांडोंना बोलावण्यात आले होते, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal Holds 20 Children hostage in UPs Farrukhabad