तरुणांनो, सरकारी नोकरी हवीय? 'या' विभागात आहेत 5 लाख रिक्त जागा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 जानेवारी 2020

देशभरात जिल्हा पातळीवर 777 पोलिस ठाणी आहेत. मंजूर 16 हजार 771 पोलिस स्थानकांपैकी 16 हजार 587 पोलिस स्थानके कार्यरत आहेत.

भारत

नवी दिल्ली : पोलिस दलात देशभरात पाच लाख जागा रिक्त आहेत. 2019 मध्ये एकूण पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाणे 9 टक्‍क्‍यांपेक्षा कमी होते, असे सरकारच्या नव्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस दलात एकूण 25 लाख 95 हजार 435 जागा आहेत. त्यापैकी 20 लाख 67 हजार 270 जागांवर पोलिस कार्यरत असून पाच लाख 28 हजार 165 जागा रिक्त आहेत. ही माहिती पोलिस संशोधन आणि विकास केंद्रा (बीपीआर अँड डी) च्या वार्षिक अहवालात दिली आहे. ही संस्था केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली काम करते. पोलिस संघटनांच्या अहवालाचे प्रकाशन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बुधवारी (ता.29) झाले. त्या वेळी 'बीपीआर अँड डी'चे संचालक व्ही. एस. के. कौमुदी उपस्थित होते. 

- स्मृती इराणींचा गंभीर आरोप; 'शाहीनबाग आंदोलनाच्या आडून जिन्नांच्या स्वातंत्र्याची चर्चा'​

अहवालातील माहितीनुसार, पोलिस दलात महिलांची कुमक एक लाख85 हजार 696 म्हणजेच 8.98 टक्के होते. गेल्या वर्षी हे प्रमाण 9. 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. पोलिस दलात 2018मध्ये एक लाख 50 हजार 690 नव्या उमेदवारांची भरती झाली, असेही यात नमूद केले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची (सीएपीएफ) क्षमता 1 जानेवारी 2019 रोजी 10 लाख 98 हजार 779 होती.

- Delhi Election 2020 : 'भारतीय मुस्लिमांना देशाबाहेर काढणे तर...'; राजनाथ सिंहांचे मोठे वक्तव्य

प्रत्यक्षात नऊ लाख 99 हजार 918 जागा भरलेल्या आहेत. 'सीएपीएफ'त महिलांची संख्या 29 हजार 532 म्हणजे 2. 95 टक्के आहे. देशात एक लाख नागरिकांमध्ये सध्या 158. 22 पोलिस असे प्रमाण आहे. नियमानुसार ते 198.65 असायला हवे. एका पोलिसामागे 503.40 असे प्रमाण हवे असताना ते 632.02 असे आहे. 

- #AusOpen2020 : फेडररला हरवत 'मॅटचा बादशाह' पोहोचला फायनलमध्ये!

साडेसोळा हजार पोलिस स्थानके 

देशभरात जिल्हा पातळीवर 777 पोलिस ठाणी आहेत. मंजूर 16 हजार 771 पोलिस स्थानकांपैकी 16 हजार 587 पोलिस स्थानके कार्यरत आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन लाख चार हजार 807 पोलिस वाहने असून चार लाख 27 हजार 529 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अशी माहिती अहवालात दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five lakh seats vacant in police force Job opportunity for youth