कच्च्या तेलाचे दर ६ महिन्यांत सर्वांत कमी; मात्र, पेट्रोल-डिझेल...

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लोकांना दिलासा मिळालेला नाही
Crude Oil Latest News
Crude Oil Latest NewsCrude Oil Latest News

Crude Oil Latest News नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांची अडचण दूर झाली आहे. मात्र, भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लोकांना दिलासा मिळालेला नाही. इंडियन ऑइलसह सर्व कंपन्यांनी पेट्रोलवरील (Petrol) तोटा भरून काढला आहे. परंतु, डिझेलमध्ये (Diesel) अजूनही तोटा आहे. ब्रेंट क्रूड गुरुवारी ९४.९१ प्रति बॅरल डॉलर होता. मंदीच्या भीतीने एक दिवस आधी ९१.५१ प्रति बॅरल डॉलरवर पोहोचला होता. भारत सध्या गरजेच्या ८९ टक्के तेल आयात करतो, असे अधिकाऱ्यांने सांगितले.

सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी साडेचार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री दरात वाढ केलेली नाही. तर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.

Crude Oil Latest News
Aamir Khan : सात दिवसांच्या प्रचंड संघर्षानंतर आमिरसाठी आली आनंदाची बातमी

एकेकाळी तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर १४ ते १८ रुपये आणि डिझेलवर २० ते २५ रुपये तोटा होत होता. मात्र, आता कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने तेल कंपन्यांचा तोटा कमी झाला आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्यामुळे तेल कंपन्यांना १४ ते १८ हजार कोटींचा फटका बसला आहे.

पेट्रोलवर कोणतीही अंडर-रिकव्हरी नाही. डिझेलसाठी ती पातळी गाठण्यासाठी थोडा वेळ लागेल, असे अधिकाऱ्याने सांगितले. परंतु, यामुळे दर तात्काळ कमी होण्याची शक्यता नाही. तेल कंपन्यांना गेल्या पाच महिन्यांत कमी किमतीत इंधन विकून झालेले नुकसान भरून काढता येईल, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले.

डिझेलवरील अंडर रिकव्हरी आता ४-५ रुपये प्रति लिटरवर आली आहे. यावर्षी २२ मार्च रोजी फ्रीझ संपले आणि ७ एप्रिलपासून नवीन फ्रीझ लागू होण्यापूर्वी पंधरवड्यात प्रत्येकी १० प्रति लिटरने दर वाढले. राष्ट्रीय राजधानीत सध्या पेट्रोलचा दर ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये आहे. हे ६ एप्रिल रोजी पेट्रोलसाठी (Petrol) १०५.४१ प्रति लिटर आणि डिझेलसाठी (Diesel) ९६.६७ प्रति लिटर वरून कमी आहे. कारण, सरकारने दर कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात केली आहे.

Crude Oil Latest News
केजरीवालांना रोहिंग्यांना मोफत फ्लॅट्स द्यायचे होते; केंद्राने दिले प्रत्युत्तर

२२ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान प्रति लिटर १० रुपयांची वाढ खर्च भरून काढण्यासाठी पुरेशी नाही आणि नवीन फ्रीझचा अर्थ अधिक तोटा होईल. सरकारला महागाई व्यवस्थापित करण्यासाठी तेल कंपन्यांनी दर सुधारित केले नाहीत. जी आधीच अनेक वर्षांच्या उच्चांकावर गेली होती. पेट्रोल आणि डिझेलचे दर खर्चाच्या तुलनेत वाढले असते तर ते आणखी वाढले असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com