

Viral Video of Snakes: धोकादायक आणि विषारी सापांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकवेळा असे व्हिडीओ व्हायरलही होतात, जे पाहून सर्वांचाच गोंधळ उडतो. विशेषत: किंग कोब्राचे व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसतात. कधी किंग कोब्रा बाटलीतून पाणी पिताना दिसतो, तर कधी मुंगसासोबत लढाई करताना. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला सापांचा व्हिडिओ, असा व्हिडिओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. या व्हिडिओमध्ये एकाच ठिकाणी अनेक धोकादायक आणि मोठे साप एकमेकांमध्ये गुंफलेले दिसतात. अनेक साप एकत्र येण्याचे असे दृश्य तुम्ही कधी पाहिले नसेल.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ व्हायरल हॉगने यूट्यूबवरही शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - कल्पना करा की तुम्ही एका पार्कमध्ये बसला आहात आणि अचानक तुम्हाला असे अनेक साप दिसले. दुसर्या एकाने या व्हिडीओतीला सापांना - सापांची टोळी असं संबोधलं.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इतका भयंकर आहे की तो पाहून कोणीही घाबरेल. अचानक एवढे साप कोणाच्याही समोर आले, तर त्याची त्राधातिरपीट उडेल. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारे साप पाहून अनेकांचा असा विश्वास आहे की, हे साप ज्या प्रकारे एकमेकांभोवती गुंडाळले गेले आहेत, त्यावरून असे दिसते की ते एकत्र रोमान्स करत आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.