Dadasaheb Kannamwar : जेव्हा पं. जवाहरलाल नेहरू यांना मारोतराव कन्नमवारांची मनधरणी करावी लागली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dadasaheb Kannamwar

Dadasaheb Kannamwar : जेव्हा पं. जवाहरलाल नेहरू यांना मारोतराव कन्नमवारांची मनधरणी करावी लागली!

तूम्ही अनिल कपून आणि परेश रावल यांची भूमिका असलेला नायक चित्रपट अनेकवेळा पाहिला असेल ना. त्यामध्ये नायकाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळताच तो एका दिवसात फटाफट निर्णय घेत सुटतो. आणि योग्य मुख्यमंत्री होऊन दाखवतो. अगदी तसेच एक मुख्यमंत्री आपल्या राज्यातही होऊन गेले आहेत. ज्यांनी एका वर्षाच्या काळात असे काही निर्णय घेतले आहेत जे आजही आपल्या उपयोगी पडत आहेत.

त्या धाडसी मुख्यमंत्र्याचे नाव होते मारोतराव कन्नमवार. ते संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ एकच वर्षाचा कालावधी मिळाला पण त्यातही त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांचा आज स्मृतिदीन. मारोतराव कन्नमवार यांच्या जीवनात अशीही एकवेळ आली होती की खुदद् पंडीत जवाहरलाल नेहरूंना त्यांची मनधरणी करावी लागली होती. काय होता तो किस्सा जाणून घेऊयात.

हेही वाचा: Dadasaheb Gaikwad : माझा दादासाहेब म्हणजे शंभर नंबरी सोनं; डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे का म्हणाले!

मारोतराव कन्नमवार यांचा जन्म 10 जानेवारी 1900 ला महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील मुलज जवळील मारोडा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सांनशिवपंथ कन्नमवार व आईचे नाव गंगुबाई कन्नमवार होते. मारोतराव कन्नमवार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे जुबली हायस्कूल येथून पूर्ण झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याकारणाने त्यांनी घरोघरी पेपर टाकने, रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासणे यांसारखी कामे देखील केलीत.

मारोतराव कन्नमवार यांच्यावर शालेय जीवनापासूनच राष्ट्रप्रेमाची भावना होती. एकदा लोकमान्य टिळक चंद्रपुरात येणार होते तेव्हा मारुतराव शिकत होते. टिळकांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी येऊ नये असा आदेश काढण्यात आला होता. पण, मारोतराव यांनी ह्या आदेशाला न जुमानता टिळकांच्या भाषणाला हजेरी लावली व त्यांच्या भाषणाने ते चांगलेच प्रभावित झालेत.

हेही वाचा: यशवंतराव चव्‍हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

शालेय जीवनापासूनच मारोतरावांना वाचनाचचे प्रचंड वेड होते. त्यांचा बहुतेक वेळ हा वाचनालयात जायचा. तेव्हा वाचनालयातील अनेकांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा मारोतराव ऐकत. गांधी विचारांची प्रेरणा देखील मारोतरावांच्या मनावर येथूनच झाली. गांधी व टिळक यांच्या विचारांने प्रभावित होऊन मारोतराव देशसेवेत असे विविध चळवळीत जोडले गेले.

हेही वाचा: Amruta Fadnavis : मी भजन जरी केलं तरी... अमृता फडणवीस ट्रोलर्सबद्दल काय म्हणाल्या?

मारोतराव यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 1918 च्या स्वतंत्र चळवळीमधून झाली. तसेच महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.पुढे मारोतराव कन्नमवार, त्यावेळीची मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या नागपूर शहराचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष झाले.

हेही वाचा: Pune News : पुण्यात महिलेवर पाळत ठेवणारे दोन गुप्तहेर अटकेत; नेमकं कारण काय?

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळामध्ये कन्नमवार हे उपमुख्यमंत्री झाले तसेच त्यांच्याकडे दळणवळण बांधकाम ह्या खात्यांचा पदभार देखील होता. 1962 साली चीनने युद्धाची घोषणा न करता भारतावर आक्रमण केले. त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला पाचारण करून संरक्षण खात्याची जबाबदारी दिली.

यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर मारोतराव कन्नमवार यांनी संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. 1962 च्या चीनच्या आक्रमणानंतर देशाच्या संरक्षण निधीला पाठबळ देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात जनसंपर्क अभियान, क्रिकेट मॅच, वृक्षरोपण यांसारखे अभियान राबवून 7 कोटी 91 लाख 55 हजार रुपये जमा करून दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचवले.

हेही वाचा: Bomb Threat : मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब? जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

कधीकाळी वृत्तपत्रे विकणाऱ्या व काँग्रेस कमेटीच्या बाहेर ठेवलेल्या बाकडयावर दिवस काढणाऱ्या मारोती कन्नमवारांचा प्रवास थक्क करणारा आहे. फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार विदर्भाचे वेगळे राज्य झाले असते तर कन्नमवार हे त्याचे पहिले मुख्यमंत्रीच झाले असते.

पुढे 1959 मध्ये नागपुरात काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अधिवेशन यशस्वीरित्या भरवून त्यांनी आपले ते स्थानमहात्म्य सिध्दही केले होते. विदर्भ राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडून कन्नमवारांनी एका निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यासारखे महाराष्ट्रात राहणे तेव्हा मान्य केले आणि त्या बळावर यशवंतरावांचे मुख्यमंत्रीपद शाबूत राहिले.

हेही वाचा: Smartphone Offer: Redmi च्या बेस्टसेलर फोनवर बंपर डिस्काउंट, १०४९ रुपयात करा खरेदी, इयरफोन्स फ्री

मात्र त्यासाठी कन्नमवारांचे मन वळवायला प्रत्यक्ष तत्कालिन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनाही मेहनत करावी लागली. त्यांना आपला शब्द खर्ची घालून कन्नमरावांची मनधरणी करावी लागली.

चंद्रपूरच्या भानापेठ नावाच्या साध्या वस्तीतील एका दरिद्री कुटुंबात दादासाहेबांचा जन्म झाला. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि कोणत्या धनवंत वा संख्यासंपन्न जातीचे पाठबळ नसलेल्या या साध्या माणसाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत केलेली वाटचाल कोणालाही थक्क करणारी आहे.

हेही वाचा: Bone Cancer : ही साधीसुधी दुखणी असू शकतात हाडांच्या कर्करोगाची लक्षणे

अशा या निस्वार्थी आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम करणाऱ्या नेत्याने 24 नोव्हेंबर 1963 मध्ये अखेरचा श्वास घेतला. जीवनाच्या अगदी शेवटच्या क्षणीही ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरतच होते.