धक्कादायक! फेसबूकच्या 26 कोटी यूजर्सचा डेटा झाला लीक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून ही माहिती या डाटाबेसमध्ये उपलब्ध होती. त्यामुळे अनेक हॅकर्सनी ही माहिती डाऊनलोड केली असण्याची शक्‍यता बॉब यांनी वर्तवली आहे.

नवी दिल्ली : डेटा चोरी आणि गैरव्यवहारांमुळे आधीच अडचणीत असलेल्या फेसबूकच्या अडचणींमध्ये नव्याने वाढ झाली आहे. फेसबूकच्या 26 कोटी सत्तर लाख वापरकर्त्यांची माहिती उघड झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुलनाकार आणि सुरक्षा संशोधक बॉब डायचेंको यांच्या अहवालानुसार, वापरकर्ता आयडी, फोन नंबर आणि त्यांची नावे यांचा समावेश असलेला 26 कोटी 71 लाख 40 हजार 436 वापरकर्त्यांची माहिती ऑनलाईन डाटाबेसवर उघड झाली आहे.

- Breaking : उत्तर भारतात 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप; अफगाणिस्तान, पाकिस्तान हादरले!

या विषयी बॉब यांनी सांगितले की, हा डेटाबेस कोणालाही पासवर्ड अथवा इतर संकेतांकांशिवाय मोफतपणे उपलब्ध होवू शकतो. त्यामुळे या माहितीचा वापर करुन स्पॅम एसएमएस आणि सायबर हल्ल्यांसाठी केला जाऊ शकतो. यानंतर बॉब यांनी इंटरनेटची सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी संपर्क साधून ही माहिती त्यांच्या सर्व्हरवरुन हटवण्याची मागणी केली आहे.

- Forbes India : 'विराट'च एक नंबर; खेळाडूंनाच नाही, तर 'या' बॉलिवूड सेलेब्रिटींना टाकले मागे!

मात्र, दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून ही माहिती या डाटाबेसमध्ये उपलब्ध होती. त्यामुळे अनेक हॅकर्सनी ही माहिती डाऊनलोड केली असण्याची शक्‍यता बॉब यांनी वर्तवली आहे.

- Video : पाकिस्तानी Tik-Tok स्टारला जबर मारहाण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Data leak of 26 million users being investigated by facebook