Breaking : उत्तर भारतात 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप; अफगाणिस्तान, पाकिस्तान हादरले!

वृत्तसंस्था
Friday, 20 December 2019

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, रावळपिंडी आणि पेशावर या शहरांमध्ये भूकंपाने जोरदार हादरे दिले.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सीएए आणि एनआरसी सारख्या प्रश्नांमुळे धगधगत असलेली भारताची राजधानी दिल्ली शुक्रवारी (ता.20) भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये काही ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. 6.8 रिश्टर स्केल एवढी तीव्रता या भूकंपाची होती. अफगाणिस्तानमधील हिंदुकूशमध्ये भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे समोर येत आहे. यामुळे भारतासह अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जमीन हादरण्यास सुरवात झाल्यानंतर अनेकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. त्यामुळे आतापर्यंत कोणती जीवित हानी झाल्याची माहिती समोर आली नाही. 

- Video : अन् पोलिसांनी चक्क आंदोलकांसह गायले राष्ट्रगीत!

दरम्यान, भारतातील दिल्ली, चंदीगड, श्रीनगर, जम्मू-काश्मीर, फरिदाबाद, नोएडा, गाजियाबाद, मथुरा, मेरठ, हिमाचल प्रदेशमधील डलहौसी आणि चंबा याठिकाणी भूकंपाचे हादरे बसले. मात्र, याची तीव्रता कमी होती. अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याने अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये भूकंपाची तीव्रता जास्त नोंदवली गेली आहे. 

- दिल्लीत तणाव; जामा मस्जिद परिसरात प्रचंड जमाव एकवटला!

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, रावळपिंडी आणि पेशावर या शहरांमध्ये भूकंपाने जोरदार हादरे दिले. भूकंपामुळे अफगाणिस्तानमधील झालेल्या हानीची माहिती अजून मिळाली नाही. पण, भूकंपाची तीव्रता जास्त असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

- अखेर न्याय मिळाला! उन्नाव बलात्कारप्रकरणी कुलदीप सेंगरला जन्मठेप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake of magnitude above 6 struck the Hindu Kush region in Afghanistan