Delhi Violence : हिंसाचारातील मृतांची संख्या 34 वर

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

ईशान्य दिल्लीच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. यामध्ये मृतांची संख्या आता 34 वर गेली आहे. सलग चौथ्या दिवशी झालेल्या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंदोलकांनी घरे, गाड्या आणि दुकानांची नासधूस करत आगी लावल्या. दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. चांदबाग, भजनपुरा भागातही आंदोलनकर्त्यांनी काही ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न केला. सीएए समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर आज सकाळी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

दरम्यान, दिल्लीतील हिंसाचाराला गृहमंत्री जबाबदार आहेत. पण त्यावेळी मुख्यमंत्री कुठे होते? हा सुनियोजित कट आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला होता. 

संबंधित बातम्या

Delhi Violence : दिल्ली हिंसाचारावर अजित डोवाल यांचे वक्तव्य; म्हणाले...

Delhi Violence : दिल्लीच्या दंगलीला गृहमंत्री जबाबदार, मुख्यमंत्री कुठे होते? : सोनिया गांधी

Delhi Violence : दिल्लीत हिंसाचार सुरुच; 7 जणांचा मृत्यू

#DelhiViolence : दिल्ली पेटविणाऱ्यांना दिसताच क्षणी गोळ्या घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death toll rises to 34 in Delhi Violence