सामरिक स्वायत्ततेसाठी आत्मनिर्भरता गरजेची - राजनाथ सिंह

Defence Minister Rajnath Singh Start-up Manthan 2021 Aero India 2021
Defence Minister Rajnath Singh Start-up Manthan 2021 Aero India 2021

बंगळूर - सामरिक स्वायत्तता टिकवण्यासाठी संरक्षण उपकरणांच्या उत्पादनात आत्मनिर्भरता असणे आवश्यक आहे, असे मत आज संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मांडले. संरक्षण उपकरण उत्पादन क्षेत्रात स्टार्टअप्स आणण्याची नितांत गरज असल्याने खासगी उद्योगांबरोबर अनेक महत्त्वाचे करार केल्याचे त्यांनी सांगितले.  

राजनाथ सिंह यांनी एरो इंडिया २०२१ तंर्गत आयोजित ‘स्टार्टअप मंथन’मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, भारताला सामरिक स्वायत्तता राखण्यासाठी संरक्षण उपकरणाच्या निर्मितीत आत्मनिर्भरता आणणे गरजेचे आहे. संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयडेक्स’ (इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्स्लेन्स) उत्तम काम करत असल्याचे ते म्हणाले. परंतु आयडेएक्स अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करावी, अशी सूचना त्यांनी केली. सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी आयडेक्सला अनुदान कमी मिळत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.  त्यामुळे आपण संरक्षण सचिव (उत्पादन) आणि संरक्षण सचिवांना अनुदानाच्या प्रमाणात वाढ करता येईल का? याबाबत विचारणा केल्याचे ते म्हणाले. 

आयडेक्स म्हणजे काय
एप्रिल २०१८ मध्ये आयडेक्सची स्थापना करण्यात आली. ‘आयडेक्स’चे ध्येय एमएसएमई, स्टार्टअप्स, नावीन्यपूर्ण, संशोधन आणि विकास संस्था आणि शैक्षणिक संस्थांसह गुंतवणुकीच्या माध्यमातून संरक्षण, हवाई क्षेत्रात आत्मनिर्भरता, फॉस्टर इनोव्हेशन आणि तंत्रज्ञान विकास साध्य करण्याचे आहे. आयडेक्सने देशातील आघाडीच्या इनक्यूबेटरबरोबर करार केले आहेत. आयडेक्स स्थापन झाल्यापासून  फंड स्कीम योजनेतून ३८४ स्टार्टअप्समध्ये ४५०० कोटींची गुंतवणूक झाली आहे. 

एमएसएमईतील ४५ उद्योजकांचा सहभाग
यंदाच्या एरो इंडिया शोमध्ये सहभाग घेणाऱ्या एमएसएमई क्षेत्रातील ४५ कंपन्यांना अगोदरच २०३ कोटींची ऑर्डर मिळाली आहे. भविष्यात देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने स्टार्टअपवरच अवलंबून राहणार आहे, असे राजनाथसिंह म्हणाले. दरम्यान, तीन फेब्रुवारीपासून बंगळूर येथे सुरू असलेल्या एरो इंडियाचा आज समारोप झाला. कोरोना संसर्गामुळे यंदा  तीन दिवसांसाठीच एरो इंडिया शोला परवानगी देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com