Arvind Kejriwal : केजरीवाल उद्धव ठाकरे अन् शरद पवारांची मुंबईत घेणार भेट! करणार 'ही' महत्वाची मागणी

Delhi CM Arvind Kejriwal to meet Uddhav Thackeray Sharad Pawar in Mumbai to seek support against the Centre
Delhi CM Arvind Kejriwal to meet Uddhav Thackeray Sharad Pawar in Mumbai to seek support against the Centre

लोकसभा निवडणूकीत भाजपविरोधात इतर विरोधी पक्ष एकवटताना दिसत आहेत. यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे. आज रविवारी दिल्लीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. यानंतर आता केजरीवाल हे लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. या भेटीदरम्यान ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २४ मे रोजी उद्धव ठाकरे आणि २५ मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत. दिल्लीतील सरकारी आधिकाऱ्यांच्या बदलीबाबत केंद्राच्या अध्यादेशाविरोधात पाठिंबा मिळावा यासाठी ही भेट असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

Delhi CM Arvind Kejriwal to meet Uddhav Thackeray Sharad Pawar in Mumbai to seek support against the Centre
Siddaramaiah : दहशतवादी हल्ल्यात आमचे नेते गेले, भाजपचा एकही नेता…; सिद्धरामय्यांच्या वक्तव्याने खळबळ

काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांच्या मुद्यावरून केंद्र विरुद्ध आप सरकार असा वाद पेटला आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दाखल दिल्ली सरकरच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं नुकताच निकाल दिला. यामध्ये दिल्ली सरकारला दिलासा देत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारलाच असल्याचं म्हटलं होतं. पण आता सुप्रीम कोर्टाचा हा आदेशच पलटवण्यासाठी केंद्र सरकारनं नवा अध्यादेश आणला आहे.

दिल्लीमध्ये गट आधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई तसेच त्यांच्या बदल्यांसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण निर्माण करण्यासाठी अध्यादेश आणला आहे. १९ मे २०२३ रोजी हा अध्यादेश आणण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दुपारी ट्विट करत केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाचा आदेश पलटवण्यासाठी अध्यादेश आणण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला होता.

Delhi CM Arvind Kejriwal to meet Uddhav Thackeray Sharad Pawar in Mumbai to seek support against the Centre
IPL 2023 : …तर धोनीची CSK फायनल खेळणार! 'हा' योगायोग ठरणार महत्वाचा

याच अध्यादेशाविरोधात विरोधकांकडून पाठिंबा मिळावा यासाठी केजरीवाल महाराष्ट्रात येत आहेत. राज्यातील दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com