'छपाक'च्या निर्मात्यांना न्यायालयाचे आदेश; वकिलांचा उल्लेख हवाच!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

मध्यप्रदेश या काँग्रेसशासित राज्यात दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारीत असलेल्या 'छपाक' या चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटातील ऍसिड हल्ल्यापासून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांचे वकील अपर्णा भट यांच्या नावाचा उल्लेख चित्रपटाच्या श्रेय नामावलीत करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान ऍसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालची वकिल अपर्णा भटने सिनेमाच्या श्रेय नामावलीत उल्लेख न केल्यामुळे सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याची न्यायालयात मागणी केली होती. वकील अपर्णा भट्ट यांच्या मते, ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची ती अनेक वर्ष वकील होती. असे असतानाही चित्रपटाच्या श्रेय नामावलीत तिचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. याचविरुद्ध भट्टने दिल्लीतील पटियाला हाउस न्यायालयात सिनेमावर बंदी आणण्याची याचिका दाखल केली होती. 

- JNU Attack : जेएनयू कॅम्पसमध्ये 'त्या' रात्री काय घडले? पोलिसांची माहिती

यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने नमूद केले, की अपर्णा भटने लक्ष्मी अग्रवालच्या बाजूने लढा दिलेला असून तिची याचिका योग्यच आहे. त्यामुळे चित्रपटादरम्यान या घटने बाबतचे दाखवले जाणारे वास्तविक फुटेज आणि प्रतिमांवर स्लाइड देऊन तिच्या योगदानाची कबुली दिली जावी, तसेच यावेळी 'अपर्णा भट' या महिलांवरील लैंगिक आणि शारिरीक हिंसाचाराच्या घटनांबाबत लढा देत आहेत असे यावेळी नमूद केले जावे असे आदेशही न्यायालयाने निर्मात्यांना दिले आहेत.

- मुलांना शाळेत पाठवा अन् 15 हजार मिळवा; सरकारची योजना

मध्यप्रदेशात 'छपाक' करमुक्त 

मध्यप्रदेश या काँग्रेसशासित राज्यात दीपिका पदुकोणचा 'छपाक' चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत ट्‌वीट करुन सिनेमा करमुक्त करत असल्याची घोषणा केली.

- सीएएवर सरन्यायधीशांची प्रतिक्रिया; म्हणाले... देश सध्या...

याबाबत कमलनाथ यांनी आपल्या ट्‌विटमध्ये सांगितले, की छपाक हा सिनेमा समाजातील ऍसिड हल्ला पीडित महिलांबाबत एक सकारात्मक संदेश देतो. या वेदनेसह आत्मविश्वास, संघर्ष आणि उमेद देणारे या चित्रपटाचे कथानक असल्याने दीपिकाची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आम्ही राज्यात करमुक्त करत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi court ordered to Chhapaak filmmakers to give credit to Laxmi Agarwal lawyer Aparna Bhat