JNU Attack : जेएनयू कॅम्पसमध्ये 'त्या' रात्री काय घडले? पोलिसांची माहिती

JNU Attack What actual happened on sundya night at JNU campus new delhi
JNU Attack What actual happened on sundya night at JNU campus new delhi

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये रविवारी रात्री मुखवटाधारी युवकांनी घडवलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर नवनवीन खुलासे समोर येत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी कॅम्पसमधील वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ फौजफाटा दाखल करण्याबाबत रविवारी सायंकाळी 6.45 वाजता संदेश पाठवल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, तासाभरानंतर कॅम्पसमध्ये आलेल्या पोलिसांनी प्रवेश केला तेव्हा हल्लेखोर पसार झाले होते, असे पोलिस सूत्राने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेएनयूच्या कॅम्पसमध्ये रविवारी रात्री हल्लेखोरांनी हिंसाचार घडवलेला असताना आणि विद्यार्थ्यांना मारहाण होत असताना कुलगुरूंनी कोणतीच भूमिका घेतली नाही, असे आरोप केले जात आहेत. यासंदर्भात रविवार दुपारनंतरचा घटनाक्रमच उघडकीस आला आहे. रविवारी रात्री जरी हिंसाचार झाला असला तरी, दुपारपासूनच जेएनयूच्या कॅम्पसमध्ये अशांतता होती.

मध्यमवर्गीयांना बजेट बिघडणार; कांद्यानंतर आता 'या' दोन दैनंदिन वस्तूंच्या दरात वाढ

कॅम्पसमधील पेरियार वसतिगृहात गोंधळ सुरू असल्याचा पहिला कॉल पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दुपारी 3.45 वाजता आला. या सूचनेची पोलिसांनी दखल घेतली आणि प्रशासकीय इमारतीच्या परिसरात असलेल्या पोलिसांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. त्या वेळी पेरियार वसतिगृहात गोंधळ सुरू होता आणि काही हल्लेखोर हे विद्यार्थ्यांना दंडुक्‍याने मारहाण करत होते. या दरम्यान कॅम्पसबाहेरून कोणतेही टोळके तेथे आले नव्हते. पोलिस येताच जमाव पांगला आणि पोलिस पुन्हा प्रशासकीय इमारतीला परतले. यादरम्यान 4 वाजून 15 मिनिटांपर्यंत नियंत्रण कक्षाला 17 कॉल आले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त देवेंद्र आर्य हे कॅम्पसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी पेरियार वसतिगृहाला भेट देऊन माहिती घेतली.

जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याने ते परतले. पेरियार वसतिगृहाच्या घटनेनंतर मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आणि आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. याशिवाय विद्यापीठाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, आतमध्ये काही भागांत हिंसाचार सुरूच होता. त्यामुळे पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. वसंतकुंज पोलिस ठाण्याचे प्रमुख आणि प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा पावणेसहाच्या सुमारास नियंत्रण कक्षाला कॉल आला आणि सुमारे 700 जण विद्यापीठात प्रवेश करत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील पोलिस पुन्हा घटनास्थळी पाठवण्यात आले; मात्र, कोणीच आढळून आले नाही. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून त्या नंबरवर कॉल केला असता मोबाईल स्वीच ऑफ झाला होता.

ब्रेकिंग : सोने-चांदीच्या भावात घसरण; पाहा आजचे भाव

साबरमती वसतिगृहाजवळ प्राध्यापक संघटनेच्या वतीने शांतता मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चात काही विद्यार्थी अडथळे आणत होते आणि ते अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर हा गट साबरमती वसतिगृहाकडे गेला आणि त्यांनी प्रवेशद्वार आणि खिडक्‍यांची तोडफोड केली. यादरम्यान डाव्या संघटनेचे विद्यार्थी एकत्र झाले आणि तेथे हाणामारी सुरू झाली. तासाभरानंतर पावणेसातच्या सुमारास विद्यापीठाच्या कुलगुरूंचा संदेश पोलिसांकडे आला आणि प्रवेशद्वाराजवळ पोलिसांच्या फौजफाट्यात वाढ करण्याची मागणी केली. विद्यापीठाबाहेर पोलिस तैनात झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण झाले होते. रात्री साडेसात ते पावणेआठच्या सुमारास पोलिसांना जेएनयू प्रशासनाकडून घटनेत हस्तक्षेप करण्याबाबतचे लिखित पत्र मिळाले; परंतु तोपर्यंत पोलिसांनी कारवाई सुरू केली होती आणि जमावही पांगला होता. या मारहाणीत जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईषा घोष जखमी झाल्या आणि त्यांना रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com