
टूलकिट प्रकरणी दिल्लीच्या पाटियाला हाउस कोर्टाने दिशा रवीच्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दिशा रवीचा जामिन नाकारला आहे.
नवी दिल्ली - टूलकिट प्रकरणी दिल्लीच्या पाटियाला हाउस कोर्टाने दिशा रवीच्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दिशा रवीचा जामिन नाकारला आहे. तसंच निर्णय 23 फेब्रुवारीला सुनावला जाणार आहे. दरम्यान, दिशाला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, टूलकिट प्रकरणी असं साहित्य टाकून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची तयारी केली जात होती. टूलकिटच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात आलं होतं की, या चळवळीत सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी व्हा. भारत सरकारविरोधात मोठा कट रचला जात होता.
हे वाचा - देशाचा 'मूड' समजलाय, आता वेगानं पुढे जायचंय - पंतप्रधान मोदी
याप्रकरणी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी आम्ही सीलबंद लिफाफ्यातून न्यायालयात देणार आहे. दिशा रवीबाबत आमच्याकडे पुरेसं साहित्य आहे. दिशाने टूलकिटमध्ये बदल केला आहे. तिचा सहकारी शांतनी दिल्लीला आला होता. तो 20 ते 27 जानेवारी या कालावधीत दिल्लीत होता असंही पोलिसांनी सांगितले.
दिल्ली पोलिस म्हणाले की, 26 जानेवारीला जो प्लॅन तयार करण्यात आला होता तो यशस्वी झाला नाही. जरं त्यांना यश आलं असतं तर परिस्थिती भयंकर असती. यांचा उद्देश पोलिसांनी हिंसाचारावेळी त्यांच्या बळाचा वापर शेतकऱ्यावर करावा असा होता. यामध्ये जास्त शेतकऱी जखमी झाले असते तर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून परिस्थिती आणखी बिघडवण्याची तयारी करता आली असती असा दावाही पोलिसांनी न्यायालयात केला.
इंधन दरवाढीवर अमूलचं कार्टूनद्वारे मार्मिक भाष्य; नेटिझन्सनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
टूलकिट प्रकरणात निकिताचा मोबाइल तपासण्यात आला. यातून समोर आलं की, निकिता आणि दिशा या दोघी स्थानिक होत्या. त्यांनी Ask India Why ट्रेंड करून खलिस्तानी मुद्द्याला भारतात पुढे रेटण्याचा प्रयत्न केला गेला. शेतकरी रॅलीच्या नावावर भारतात त्यांना प्रचार करायचा होता.
दिल्ली पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तीवादावर न्यायाधीश सहमत झाले नाहीत. त्यांनी टूलकिट आणि 26 जानेवारीच्या हिंसाचाराचे काही लिंक आहे का? त्याचे काय पुरावे आहेत असा प्रश्न दिल्ली पोलिसांना विचारले. टूलकिटचं थेट काय कनेक्शन आहे की अंदाज लावावा लागे. यावर पोलिसांनी सांगितले की, आपल्याला टूलकिटमध्ये लिहिलेल्या गोष्टी आणि परिस्थिती समजून घ्यायला हवी. ही साधी केस नाही. टूलकिटमध्ये हॅशटॅग आणि लिकंसह वाचण्यासाठी सांगण्यात आलं आहे. हा सोपा मेसेज नाही. लिंक लोकांना भडकावण्याचं काम करत आहे.