
'बलात्कार एक सरप्राइज सेक्स'; सनीला हे खळबळजनक ट्वीट करणं पडलं होतं महाग
बॉलीवूड(Bollywood) इंडस्ट्रीत नावारुपाला आलेली अभिनेत्री आणि डान्सर सनी लियोन(Sunny Leone) आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. यानिमित्तानं सनीच्या एका खळबळजनक वक्तव्याविषयी अन् त्यामुळं तिला ज्या वादग्रस्त वादळाचा सामना करायला लागला होता याविषयी जाणून घेणार आहोत. बलात्कारासंदर्भात तिनं एक कमेंट केली होती ज्यामुळे सनीला मोठ्या वादानं घेरलं होतं.
हेही वाचा: 'उर्मिला आणि माझ्यात...'; बिनसलेल्या नात्यावर काय म्हणाला आदिनाथ कोठारे?
सनी लियोननं एकदा बलात्कारा संदर्भात एक ट्वीट केलं होतं अन् त्यानंतर तिनं स्वतःहून संकट ओढवून घेतलं होतं. अभिनेता कमाल खाननं मुद्दामहून त्या ट्वीटला व्हायरल केलं होतं. त्यानं लिहिलं होतं,''हे पहा,सनी लियोन काय म्हणाली- बलात्कार एक अपराध नाही तर ते फक्त एक सरप्राइज सेक्स आहे''.
हेही वाचा: कंगनाचं महेश बाबूला समर्थन; म्हणाली,'हे खरंय,तो बॉलीवूडला परवडणार नाही'
सनी लियोननं त्यानंतर हे ट्वीट आपण केलंच नव्हतं असा दावा केला होता. इतकच नाही तर ती म्हणाली होती,''माझं अकाऊंट पाच मिनिटांसाठी हॅक केलं गेलं होतं. त्यानंतर सनीनं कमाल आर खान विरोधात आपल्या ट्वीटर पेजवरती बलात्कारासंदर्भात जे आपण बोललो त्याला चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाकडे तक्रार नोंदवली होती. पण त्यानंतर कमाल आर खाननं देखील सनी लियोन आणि तिच्या पतीविरोधात तक्रार नोंदवून पलटवार केला.
हेही वाचा: 'त्यादिवशी माझा वाढदिवस होता,अख्खं ठाणं जळत होतं'; हेमांगीची पोस्ट चर्चेत
कमाल खान म्हणाला होता,''सनी लियोन आणि तिच्या नवऱ्याविरोधात मी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी २४ तासाच्या आत त्यांना पकडायला हवं होतं. जर पोलिसांनी त्यांना अटक केली नाही तर मी कोर्टात जाईन. मी केवळ सनीच नाही तर तिचा पती डेनियल विरोधातही तक्रार नोंदवली आहे''. त्यानंतर सनीनं म्हटलं होतं,''मी मुर्खांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही. अशा गोष्टींवर बोलून मी त्यांना आणखी प्रोत्साहन देऊ इच्छित नाही. पण हा एक संवेदनशील मुद्दा आहे,दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणानंतर तर नक्कीच असं म्हणता येईल. सर्वात अधिक महत्त्व त्याला दिलं गेलं पाहिजे. लोकं माझ्या बाबतीत काय बोलतात याचा मी विचार करीत नाही. मला काहीही म्हणा पण उगाचच चुकीच्या गोष्टींशी मुद्दामहून माझं नाव जोडू नका''.
हेही वाचा: 'कॉफी विथ करण' मध्ये सामिल न होण्याचा ट्विंकलचा निर्णय; कारणही सांगितलं...
सनीनं ट्वीटरवर खरंतर जाहिरपणे म्हटलं होतं-''बलात्कार हा अपराध नाही,हे एक सरप्राइज सेक्स आहेटट. सनीच्या फॉलोअर्सनी देखील या ट्वीटसोबत सनीचा खरपूस समाचार गेतला होता. कितीतरी वेळा रीट्वीट देखील केलं होतं. त्यानंतर सनीनं यासंदर्भात स्पष्टिकरण द्यायला नकार देत म्हटलं,टटज्यानं कोणी म्हटलं आहे की बलात्कार सरप्राइज सेक्स आहे,तो मुर्ख आहे. मी असं कधीच म्हटलं नाही. विचारांनी समृद्ध व्हा जरा....''
Web Title: Sunny Leone Viral Tweet On
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..